सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे तर काही आपल्याला थक्क करणारे असतात. पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून आपल्या चेहऱ्यावर या दोन्ही प्रतिक्रिया येतील असे दृश्य दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क काही माकडांसोबत खेळत असल्याचे दिसत आहे.
लहान मुलं प्राण्यांना बघून घाबरतात किंवा त्यांना लांबून पाहताच तिथून पळ काढतात. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क काही माकडांबरोबर खेळत असल्याचे दिसत आहे, हे दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: वाघाचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडिओ:
हा गोंडस व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले असुन, या व्हिडीओला १५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.