सध्या गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. कुठे बाप्पाच्या दर्शनसाठी लांब लांब रांग लागत आहे तर कुठे ढोल-ताशांचे वादन सादर केले जात आहे. गणेशोत्सव म्हणजे ढोल-ताशा असणारच. पुण्यात ढोल-ताशा म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक तरुण-तरुणी आहेत जे ढोल ताशाचे वादन करण्यासाठी उत्साही असतात तर कित्येक लोक हे वादन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी उत्सूक असतात. एवढचं काय अगदी लहान वयापासून मुल-मुली ढोल ताशा पथकामध्ये वादन करताना दिसतात. सध्या अशाच एका गोंडस चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो आपल्याच शैलीमध्ये सुंदर ढोल वादन करताना दिसत आहे. चिमुकल्याचा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ढोल-ताशा वादन करणे ही एक कला आहे आणि कला ही देवाने दिलेली देणगी आहे त्यामुळे ज्यांच्या अंगी कला आहे त्यांनी ती जोपासली पाहिजे. पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतात कारण येथे कलेचे सन्मान केला जातो आणि कला जोपासली जाते. पुण्यात नाटक, संगीत, गायन, वादन किंवा अभिनय अशा अनेक कलांचा सन्मान केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवदरम्यान ढोल-ताशा वादन सादर हाच सांस्कृतिक वारसा जपला जातो. ढोल ताशा वादनाची ही कला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला वारसा म्हणून मिळते. या कलेचा वारसा नवी पिढी तितक्याच उत्साहाने पुढे चालवत आहे. याची प्रचिती देणारा या चिमुकल्या वादकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा – शिव-पार्वती विवाह सोहळा आता पुण्यात!, तुम्ही पाहिला का ‘हा’ जिवंत देखावा? Video होतोय Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला डोळ्यावक काळा गॉगल लावून आणि कंबरेला ढोल बांधून वादन सादर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुकला स्टाईलमध्ये उभारून, मजेशीर हावभाव दर्शवत वादन करतो आहे जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. चिमुकल्याचे हावभाव पाहून तुमच्या लक्षात येईल की, “हा मुलगा फक्त वादन सादर करत नाही तर त्याचा आनंदही घेत आहे. चिमुकल्याचा हा मराठामोळा स्वॅग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

हेही वाचा – ‘शापित पार्किंग क्षेत्र, विश्वास नसल्यास….!”, नो-पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेकरांचा टोला; पुणेरी पाटी Viral

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ganesh_ubale_1221_ आणि chatrapati.dhol_tasha_pathak या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,”कला ही देवाने दिलेली देणगी आहे, ती सादर करायला लाजू नका!”

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करुन चिमुकल्याचे कौतु केले आहे. एकाने कमेंट करून लिहिले की, “छोटा पॅकेट बडा धमाका!” o
दुसऱ्याने लिहिले, “कडक!” तिसऱ्याने लिहिले, “छोटा वादक!”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toddlers marathmola swag small boy playing drum in style during ganesha utsav 2024 video viral snk