Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापुरते मर्यादित नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला रस्त्याच्या कडेला बसून दिवाळीचे दिवे विकत आहे. खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला दिवे विकण्यासाठी घडपडतोय. या सगळ्यात त्याच्या चेहऱ्यारचं हसु अजिबात कमी झालेलं नाहीये. आजुबाजुचे लोकही त्याच्याकडे कुतुहलाने पाहत आहेत. तर कोणी त्याच्याकडचे दिवे विकत घेताना दिसत आहे. या लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकाने हसत हसत आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. असं म्हणतात की, हसल्याने आपलं आयुष्य वाढतं. मोठ मोठ्या अपेक्षा न ठेवता समाधान शोधलं की आनंद आपोआप मिळतो हेच या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापाला मिठी मारून कधी बघितलंय का? सरकारी नोकरीचा रिझल्ट लागल्यावर वडीलांची प्रतिक्रिया पाहून येईल डोळ्यांत पाणी

चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.  अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत “लेक असावा तर असा” असं म्हंटलंय. तर आणखी एकानं लिहिलंय, “माणसाची परिस्थिती त्याला असं करण्यास भाग पाडते.” आणखी एकानं लिहिलंय, “गरीब परिस्थिती माणसाला हतबल बनवते.”