Flight Door Breaks: उड्डाणादरम्यान विमानात अनेक प्रकारच्या घटना घडतात. कधी कोणी अश्लील कृत्य करतो तर कधी कोणी लज्जास्पद कृत्य करतो! फ्लाइट स्टाफला सर्व काही व्यवस्थापित करावे लागते. अनेक वेळा मद्याच्या नशेत प्रवासी विमानात गोंधळ घालतात, फ्लाइट अटेंडंटनाही अशा लोकांशी सामना करावा लागतो. विमान प्रवास हा जितका मजेशीर आहे तितकाच तो धोकादायकदेखील आहे. कारण एखाद्या वेळेस बस किंवा ट्रेन अपघातात तुम्ही वाचू शकता, पण विमान अपघातात क्वचितच कोणी वाचल्याचं तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे विमानातून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे प्राण कंठाशी येतात. याच पार्श्वभूमीवर विमानातील एक अतरंगी फोटो समोर आला आहे. एका विमानाचा दरवाजा तुटल्याने गोंधळ उडाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

नेमकं घडलं तरी काय?

विमान उड्डाण करताच एका विमानातील टॉयलेटचा दरवाजा तुटल्याने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक फ्लाइट अटेंडंट टॉयलेटचा तुटलेला दरवाजा धरून बसलेली दिसत आहे. फ्लाइट अटेंडंट सीटवर बसलेली आहे आणि एका हाताने तुटलेला दरवाजा धरून आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी खिल्ली उडवली. त्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?
bomb threat jagdish uikey arrested
विमान कंपन्यांना १०० हून अधिक धमक्या पाठविणारा जगदीश उईके कोण?
Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप

(हे ही वाचा: VIDEO: ‘ती’ एक चूक तरुणाच्या जीवावर बेतली; झोका घेताना थेट कोसळला…पर्यटनस्थळातील थरारक व्हिडीओ आला समोर)

तर व्हायरल झालेल्या दुसऱ्या फोटोमध्ये दोन प्रवासी केबिन क्रूला मदत करताना दिसत आहेत, जेणेकरून विमान उतरेपर्यंत कोणतीही मोठी समस्या उद्भवू नये. हे विमान एअरबस ए ३५० होते, ज्याने सोमवारी संध्याकाळी ५ वाजता हाँगकाँगहून उड्डाण केले. १६ तासांच्या प्रवासानंतर विमान न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. साधारणपणे एअरबस A350 सारख्या विमानात ३०० ते ५०० प्रवासी असतात.

हे प्रकरण हाँगकाँगच्या प्रमुख एअरलाइन कॅथे पॅसिफिक एअरवेजच्या विमानाशी संबंधित आहे. हे विमान हजारो फूट उंचीवर उडत असताना टॉयलेटचा दरवाजा तुटला. फ्लाइटच्या तुटलेल्या दरवाजाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने फोटो क्लिक करून सोशल मीडियावर शेअर केल्याचे सांगितले जात आहे. फोटो शेअर करून दावा करण्यात आला की, टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा दरवाजा तुटला. जेव्हा या प्रकरणाला वेग आला तेव्हा एअरलाइनने सांगितले की, त्यांना या समस्येची आधीच माहिती होती.

येथे पाहा फोटो

आता या घटनेचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून तो बर्‍याच नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्हीदेखील आपल्या प्रतिक्रिया द्या.