Toilet Seat In Car: गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही. गरज भासल्यास माणूस अशी कोणतीही वस्तू तयार करू शकतो, जी पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकीत होतील. जगभरात अशा सृजनशील लोकांची कमतरता नाही, जे आपल्या टॅलेंट आणि देसी जुगाडच्या जोरावर लोकांना आश्चर्यचकित करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एक कारमध्ये कमोड म्हणजेच वेस्टर्न टॉयलेट बसवलेले दाखवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारमधील टॉयलेट सीट

वास्तविक, असे अनेक व्हिडिओ दररोज इंटरनेटवर दिसत आहेत, ज्यामध्ये तुम्ही वाहनांच्या आत बाथरूम, बेड किचन यासारख्या सुविधा पाहू शकता. आजच्या युगात, सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे बरेच लोक आपली व्हॅन किंवा कारचे रुपांतर घरामध्ये करतात. ज्यामध्ये सर्व आवश्यक गोष्टी आधीपासूनच असतात, परंतु अशी वाहने भारतात क्वचितच दिसतात. नुकताच अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या फॉर्च्युनर कार बसवलेले कमोड (वेस्टर्न टॉयलेट) दाखवताना दिसत आहे.

हेही वाचा – मोबाइलवर पेपा पिग, कोको मेलन आणि कार्टून मॅरेथॉन पाहण्यामुळे तुमची मुलं ‘zombie’ झाली आहेत का? संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर

हेही वाचा – मगरीजवळ जाणे तरुणाला पडले महागात; मगरीने अचानक हल्ला केला अन् जबड्यात…पाहा थरारक व्हिडीओ

हेही वाचा – प्रेमाच्या भांडणात एक मच्छर ठरला खलनायक! किशोरवयीन मुलीची प्रेमकथा झाली व्हायरल

व्हिडिओ व्हायरल होत आहे
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @desimojito नावाच्या अकांउटवर शेअर करण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या कारमध्ये टॉयलेट सीट बसवण्यात आल्याचे दिसून येते. कार मागील सीट काढून एक लहान तंबूचा जागा तयार केली ज्याच्या आत पश्चिमात्य पद्धतीचे टॉयलेट सीट लावण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आत बसलेलीही दाखवली आहे. हा व्हिडिओ सातत्याने पाहिला जात आहे आणि खूप पसंती मिळत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्याने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “शेवटी टॉयलेटमध्ये चार्जिंग सॉकेट लावण्याची काय गरज होती?” दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ रस्त्यात स्पीड ब्रेकर आला तर हा जुगाड उद्ध्वस्त होईल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toilet seat in car indian man install toilet in car with desi jugaad car bathroom video viral snk