Toll Plaza Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओमध्ये काही लोक टोल प्लाझावर ट्रक थांबवून तेथील कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद घातलाना आणि नंतर टोल प्लाझाची तोडफोड करताना दिसत आहेत. तसेच या घटनेनंतर ते ट्रकमधून निघून जाताना दिसतात. दरम्यान, हा व्हिडीओ भारतातील एका टोल प्लाझावरील असल्याचा दावा करीत मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडीओ खरंच भारतातील आहे का? याचा शोध घेतला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं, ते नेमकं काय ते जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर काश्मिरी हिंदूने त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
इतर वापरकर्तेदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून, त्यानंतर त्यातून स्क्रीन ग्रॅब्स मिळवून तपास सुरू केला. आम्ही व्हिडीओचा मुख्य स्रोत तपासण्यासाठी स्क्रीन ग्रॅबवर रिव्हर्स इमेज सर्च चालवला.
यावेळी आम्हाला PNS न्यूज 24 वर व्हिडीओचे स्क्रीनशॉट सापडले. ही बातमी १८ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाशित झाली होती.
बातमीत म्हटले आहे की, सीसीटीव्ही फुटेज दिसतेय की, ढाका एलिव्हेटेड एक्स्प्रेसवेवरील कुरील टोल प्लाझा येथे रात्री ९:४५ वाजता एक मध्यम आकाराचा टेम्पो थांबला. हा टेम्पो माणसांनी गच्च भरलेला होता, यावेळी टेम्पोमध्ये बसलेले जादा लोक पाहून टोल प्लाझाच्या काउंटरवरील कर्मचाऱ्याने टोल घेण्यास नकार दिला.
वरील बातमीनुसार ही घटना बांगलादेशातील एका एलिव्हेटेड टोल रोडवर घडल्याचे सूचित होते.
आम्हाला हीच बातमी ruposhibangla.us या दुसऱ्या वेबसाइटवरदेखील सापडली आहे.
https://ruposhibangla.us/%E0%A6%8F%E0%A6%95%E0%A7%8D%E0%A6%B8%E0%A6%AA%E0%A7%8D%E0%A6%B0 %E0%A7%87%E0%A6%B8%E0%A6%93%E0%A7%9F%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%9F%E0%A7%87% E0%A6%BE%E0%A6%B2%E0%A6%AA%E0%A7%8D%E0%A6%B2%E0%A6%BE%E0%A6%9C/
या बातमीतनुसार, फर्स्ट ढाका एलिव्हेटेड एक्सप्रेसवे कंपनीचे ऑपरेशन्स मॅनेजर हसन हसीब खान यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव छोटा टेम्पो थांबवण्यात आला. याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. टोल प्लाझाचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्यांच्याशी नुसताच वाद झाला.
आम्हाला ढाका ट्रिब्युनवर या घटनेबद्दलची अजून एक बातमीदेखील सापडली.
इतर अनेक माध्यम संस्थांनीही बातमी शेअर केली.
अमर टीव्हीच्या फेसबुक पेजवरही आम्हाला व्हिडीओ सापडला. ही घटना बांगलादेशात घडल्याची माहिती कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे.
निष्कर्ष : बांगलादेश टोल प्लाझाच्या तोडफोडीचा हा व्हिडीओ भारतात मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि ही घटना भारतात घडली असल्याचा दावा केला जात आहे. पण, व्हायरल केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.
© IE Online Media Services (P) Ltd