Tomato Price Hike: सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांच्या आसपास आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मध्य प्रदेशात टोमॅटोच्या किमती वाढल्यानंतर आता शहरातील मोबाईल विक्रेत्याने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. या दुकानचालकाने स्मार्टफोन खरेदीवर २ किलो टोमॅटो मोफत देण्याची ऑफर आणली आहे. या अनोख्या ऑफरची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

मोबाईल शोरुमच्या दुकानात मोबाईल खरेदीवर टोमॅटो ऑफर देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील अशोक नगर येथील एका मोबाईल शोरुममध्ये ही ऑफर देण्यात आलीय. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर २ किलो टोमॅटो मोफत देण्याची घोषणा केली आहे. शहरात टोमॅटोचे भाव १६० रुपयांच्या पुढे गेले असून त्यामुळे लोकांनी मोबाईल खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी केली.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

मोबाईल शॉपीतील तरुण व्यावसायिक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, आजच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल शोरूममध्ये विविध ऑफर्स दिल्या जातात. अशा स्पर्धेच्या काळात जेव्हा आम्हाला कळले की टोमॅटोचे भाव वाढले आहेत आणि भाजी मंडईत टोमॅटो १६० रुपये किलोने विकला जात आहे, तेव्हा आम्ही ठरवले आहे की आम्ही ग्राहकांना मोबाईल खरेदीवर २ किलो टोमॅटो मोफत देऊ.

पाहा फोटो

हेही वाचा – “हे सगळं मोदींमुळे..”, टोमॅटो भाववाढीने त्रस्त भाजी विक्रेत्याचा जुगाड चर्चेत! अखिलेश यादव यांनी दाखवला Video

शोरूमचालक सांगतात की, जेव्हापासून त्यांनी ही योजना लागू केली आहे, तेव्हापासून ग्राहकांची संख्या वाढली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. आता टोमॅटो बेंगळुरुहून आयात केली जात आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं दरात वाढ झाल्याची माहिती बाजारातील टोमॅटो व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता जाणवत नाही. पुढच्या काही दिवसात टोमॅटोचे नवीन पीक बाजारात येणार आहे. पण हिमाचल प्रदेश किंवा अन्य उत्पादक प्रदेशात जोरदार पाऊस झाला तर टोमॅटोचे दर असेच वाढत राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader