Tomato price hike: ‘एक टमाटर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू!”…..टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर सध्या देशाच्या विविध भागात हा डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळेल यात काही शंकाच नाही. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किंमती १०० रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाऊक बाजारात भाव वाढल्याने स्थानिक बाजारपेठेतील भाव ८० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले असून, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याचे कारण शेतकऱ्यांनी सांगितले आहे. टोमॅटोचा पुरवठा कमी होण्यामागे उत्पादनाची कमतरता आणि तीव्र उष्णता हेही कारण सांगण्यात आले. दरम्यान वाढत्या टोमॅटोच्या किंमतीची ही बामती ट्विटरवर पसरताच लोकांनी त्यावर मीम्स तयार करण्यास सुरूवात केली आहे. वेलकम या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या ‘आलू लेले’ या सीनपासून फिर हेराफेरीमधील आनंदी टेम्पलेट्स वापरण्यापर्यंत अनेक मजेशीर मीम्स सध्या ट्विट व्हायरल होत आहेत.
चला काही मजेशीर मीम्स पाहू या
टोमॅटोच्या किमती वाढत राहतील की ताज्या कापणीमुळे परिस्थिती सुधारेल हे पाहणे बाकी असले तरी, सध्याची दरवाढ ही ग्राहकांसाठी मोठी चिंतेची बाब आहे आणि त्याचा महागाईवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.