टोमॅटो हे फळ आहे की भाजी असा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. भारतात कोणतीही भाजी करा, त्यात टोमॅटो टाकला की चव अनेक पटींनी वाढते. सध्या टोमॅटोच्या किंमतीमुळे टोमॅटो चर्चेत आहे. टोमॅटोंचे दर १००-१२० रुपये प्रति किलो झाले आहेत. यामुळे अनेकांचं आर्थिक नियोजन बिघडलंय. मार्च-एप्रिलच्या उष्णतेमुळे भारतातील टोमॅटो पिकावर परिणाम झाला, परिणामी त्याचे भाव झपाट्याने वाढले. सध्या बहुतांश ठिकाणी टोमॅटो १०० रुपयांच्यावर विकला जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग टोमॅटोबद्दल सांगणार आहोत.
टोमॅटोच्या बियांसाठी मोजा ३ कोटी
युरोपात हजेरा जेनेटिक्सने विकलेल्या टोमॅटोच्या बियांबद्दल आम्ही बोलत आहोत. या टोमॅटोच्या बियांची किंमत एकून तुम्हीही चकीत व्हाल. टोमॅटोच्या या खास बियांची युरोपच्या बाजारात वेगाने विक्री होत आहे. युरोपच्या बाजारात टोमॅटो कोटींच्या भावात विकला जातोय. या अत्यंत महागड्या टोमॅटो बियांच्या एका किलोच्या पॅकेटसाठी तुम्हाला सुमारे तीन कोटी रुपये खर्च करावे लागतील. एवढ्या पैशातून तुम्ही सोने सहज खरेदी करून ठेवू शकता.
या टोमॅटोच्या एका बियापासून वीस किलो टोमॅटो तयार होऊ शकतात. यासोबतच त्याचे फळही खूप महाग आहे. या टोमॅटोची खास गोष्ट म्हणजे यात बिया नसतात. अशा परिस्थितीत टोमॅटो पिकवण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा बियाणे खरेदी करावे लागत आहे. ते खूप चवदारही असतात, त्यामुळे महाग असूनही या टोमॅटोची मागणी वाढत आहे. आता तुम्हालाही कळलं असेल की याच्या तुलनेत आपल्याकडे मिळणारे टोमॅटो हे खूपच स्वस्त आहेत.