काही जणांची जीभ तिखट आहे असं म्हणतात. पण ‘कॅडबरी’ कंपनीने आपल्या चॉकलेट्स गोडवा टिकवायला आपल्या एका कर्मचाऱ्याच्या जिभेचा ९ कोटींचा विमा काढलाय !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही आहे हेले कर्टिस. कॅडबरीमध्ये काम करणाऱ्या हेलेच्या जिभेचा ९ कोटींचा विमा कंपनीने काढलाय. हेलेचं काम काय? तर कॅडबरीमध्ये बनणाऱ्या चॉकलेट्सचा आस्वाद घेणं, ती चाखून पाहणं आणि परफेक्ट टेस्ट नसणारी चॉकलेट्स रिजेक्ट करणं. हे काम ऐकायला सोपं वाटत असलं तरी जाम कठीण आहे. चॉकलेट्सच्या वेगवेगळ्या स्वादांची जाणीव असणं आणि चवीमधला बारीक फरक ओळखू शकण्याचं टॅलेंट असणं या कामासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. हे एक मोठं शास्त्र आहे आणि याचे अभ्यासक्रमही असतात.

हेलेसारखे या कलेमध्ये प्रवीण असलेले कर्मचारी चॉकलेट कंपन्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. या मौल्यवान कर्मचाऱ्यांची कंपनी सगळ्या प्रकारे काळजी घेते. आणि म्हणूनच हेले कर्टिसच्या जिभेचा कॅडबरी कंपनीने १० लाख पाऊंड्स म्हणजेच जवळजवळ ९ कोटी रूपयांचा विमा काढलाय. आणि आपल्या ‘टेस्ट बड्स’ची काळजी घेण्याची ‘आग्रहवजा सूचना’ही हेलेला कॅडबरीने केलीये. म्हणजे फक्त चमचमीत खाणं टाळलं तर हेले कर्टिस कॅडबरी चॉकलेट्सचा आस्वाद घेत पगार मिळवू शकते !
बॉस, आपल्याला पण हा जॉब पायजेल!