Alcohol Rule: जगभरात दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे रस्त्यावर अपघात होत असतात. या प्रकरणांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. या दुर्घटनांना टाळण्यासाठी इटलीमध्ये एक नवा नियम लागू करण्यात आला आहे.
इडलीमध्ये बारमध्ये जर तुम्ही जास्त दारू प्यायले असाल तर सरकार तुम्हाला टॅक्सीने घरापर्यंत पोहचवणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे या सेवेसाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही.
इटली सरकारने मद्यपींसाठी फ्री टॅक्सी सर्विस पायलट प्रोजेक्ट म्हणून एक महिन्यासाठी ६ नाईट क्लबमध्ये हा सेवेची सुरूवात केली आहे. याचा उद्देश्य रस्त्यावर होणारे अपघातांची संख्या कमी करणे आहे.
या योजनेंतर्गत लोक नाईटक्लबमधून बाहेर येताना खूप जास्त नशेत असतात, त्यांची अल्कहोल टेस्ट केली जाईल. टेस्टमध्ये जर ती जास्त दारू प्यायले असल्याचे दिसले तर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी फ्री टॅक्सी सर्व्हिस सुविधा दिली जाईल.
या योजनेसाठी फंड इटलीचे परिवहव मंत्रालय करणार आहे. या योजनेमध्ये इटलीचे परिवहन मंत्री, उप. प्रधानमंत्री आणि हार्ड राइट लीग पार्टीचे नेता माटेओ साल्विनी यांच्या प्रोत्साहन दिले आहे.
उप. प्रधानमंत्री मौंटियो साल्विनी यांनी सांगितले की, ही योजना रस्त्यावर होत असलेल्या दुर्घटनांना टाळण्यासाठी एक प्रयत्न आहे. रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी फक्त दंड आणि कायदा पुरेसा नाही.
हेही वाचा – IIT अन् IIM नव्हे, या संस्थेतून शिकून पलक मित्तलला मिळाले तब्बल १ कोटींचे पॅकेज, वाचा प्रेरणादायी कथा
युरोपियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी कौन्सिल (ETSC) च्या २०२० च्या अहवालात असे म्हटले आहे की,” मद्यपान करून वाहन चालवणे ही इटलीमध्ये एक गंभीर समस्या आहे. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत येथे जास्त लोक दारू पिऊन गाडी चालवतात.”