Canada Indian Abuse Viral Video : भारत आणि कॅनडामधील संबंध दिवसेंदिवस आणखी बिघडत आहेत. या दोन्ही देशांतील संबंध कधी सुधारू शकतील हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. पण, असे असूनही आजही शिक्षण, नोकरीसाठी भारतीय मोठ्या संख्येने कॅनडामध्ये वास्तव्य करीत आहेत. पण, या बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान अनेक भारतीयांना कॅनडात सातत्याने वर्णद्वेषासह चुकीची वागणूक मिळत आहे. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे; ज्यामध्ये कॅनडामध्ये एका भारतीय व्यक्तीशी गैरवर्तन केले जात आहे आणि तिच्याबाबत वर्णद्वेषी टिप्पणी केली गेली आहे.

कॅनडामध्ये राहणाऱ्या अश्विन अण्णामलाई नावाच्या भारतीय व्यक्तीने त्याच्याबरोबर घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या पोस्टमध्ये त्याने सांगितले की, कॅनडामध्ये त्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. मात्र, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.

व्हिडीओबाबत सांगताना ते म्हणाले की, त्या वॉटर्लू, ओंटारियोमध्ये फिरत असताना कॅनडामधील एका वृद्ध महिलेने त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली. अण्णामलाई सहा वर्षांपासून कॅनडामध्ये राहत आहेत आणि आता त्यांनी तिथले नागरिकत्वही घेतले आहे.

अण्णामलाई त्या वृद्ध महिलेला आपण कॅनेडियन नागरिक असल्याचे सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे; परंतु त्या महिलेने ते मान्य केले नाही. अण्णामलाई यांनी त्या कॅनेडियन महिलेला नम्रपणे समजावून सांगितले की, त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करू नका, मीही तुमच्यासारखा आता कॅनेडियन नागरिक आहे. त्यावर प्रत्युत्तर देत महिलेने त्याच्या इंग्रजी बोलण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्याशिवाय अण्णामलाई यांच्या त्वचेच्या रंगावरही महिलेने वाईट टिप्पणी केली; तसेच त्यांना कॅनडा सोडून निघून जाण्यास सांगितले.

“तुझे आई-वडील आणि आजी-आजोबा इथले नाहीत”

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ती कॅनेडीयन महिला अण्णामलाई यांना सांगते, की तू कॅनेडियन नाहीस. इथे बरेच भारतीय आहेत आणि तुम्ही परत भारतात निघून जावे, अशी माझी इच्छा आहे. तुमचे आई-वडील आणि आजी आजोबा इथले नाहीत.

नंतर अण्णामलाई यांनी त्या महिलेला विचारले की, तिला कॅनडाची दुसरी अधिकृत भाषा फ्रेंच बोलता येते का, या प्रश्नाकडे मात्र तिने दुर्लक्ष केले आणि “भारतात निघून जा, भारतात निघून जा”, असे बोलणे सुरूच ठेवले.

अण्णामलाई यांनी या घटनेनंतर एक पोस्ट करीत सविस्तर मत मांडले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ही काही वेगळी घटना नाही. वर्षाच्या सुरुवातीपासूनच अशा घृणास्पद घटना समोर येत आहेत. लोकही व्यसनाच्या आहारी जात आहेत; पण याचा अर्थ असा नाही की, संपूर्ण कॅनडामध्ये असे घडत आहे. आपण एक समुदाय म्हणून एकत्र येऊन या समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत.

VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

भारत-कॅनडा संबंध बिघडल्यापासून कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांना अनेकदा वर्णद्वेषी टिप्पण्यांना सामोरे जावे लागत आहे. अण्णामलाई यांनी गेल्या महिन्यात ‘वॉटर्लू रिजन रेकॉर्ड’ला सांगितले की, आजकाल आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्या अडचणींना मला कधीच तोंड द्यावे लागले नाही. मी आलो तो कॅनडा आता नाही. अण्णामलाई २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून कॅनडामध्ये आले होते.