तंत्रज्ञान, इंटरनेट, गूगल यांसारख्या गोष्टीमुळे आपल्या सर्वांचे जीवन अतिशय सुकर झाले आहेत. कोणताही प्रश्न पडला, काही शंका असेल, तर त्याचे उत्तर आपल्याला गूगलवर हमखास मिळणार, अशी आपल्याला खात्री असते. मग तो प्रश्न इतिहासातला असू दे, अन्नपदार्थांबद्दल असू दे, मनोरंजन किंवा अभ्यासासंदर्भात असू दे किंवा अगदी आपल्या आजूबाजूला कोणती दुकाने, जिम, क्लासेस आहेत त्याबाबतची विचारणा असू दे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे गूगलकडे असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या पूर्ण वर्षामध्ये कुणी सर्वाधिक काय खाल्ले इथपासून कुणी काय पाहिले, ऐकले इथपर्यंतची यादी विविध माध्यमे वर्षाच्या अखेरीस शेअर करीत असतात. त्यामध्ये आता गूगलच्या ‘नीयर मी’ फीचरचा वापर करून, वापरकर्त्यांनी आपल्या जवळच्या कोणत्या जागा सर्वांत जास्त शोधल्या आहेत ते सांगितले असल्याचे ‘झी न्यूज’च्या एका लेखावरून समजते.

याआधी अॅपल आणि गूगलने या वर्षातील सर्वोत्कृष्ट गेम्स आणि अॅप्सची यादी शेअर केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामध्ये कोणत्याही एआय तंत्रज्ञान किंवा चॅट जीपीटीचा समावेश नव्हता.

हेही वाचा : AI तंत्रज्ञान, चॅट जीपीटी नव्हे, तर ॲपल आणि गुगलनुसार ‘हे’ ठरलेत २०२३ चे सर्वोत्कृष्ट गेम्स आणि ॲप्स!

गूगलवर एखादी गोष्ट आणि तिचे पर्याय पटकन शोधायचे असतील, तर आपण अगदी सहज गूगलच्या, ‘नीयर मी’ [Near me] या फीचरचा वापर करीत असतो. मात्र, गूगलने शेअर केलेल्या २०२३ मधील सर्वाधिक विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या यादीमध्ये कोणत्या जागा ‘नीयर मी’चा वापर करून सर्वांत जास्त शोधल्या गेल्या आहेत हे सांगितले आहे. त्यामध्ये, मुलींनी/ महिलांनी ‘माझ्याजवळ असणारे ब्युटी पार्लर’ हे सर्वाधिक शोधले असून, या यादीमध्ये, जवळ आणारे कोडिंग क्लास, खणावळ यांसारख्या जागादेखील सर्च केल्याचे समजते.

‘नीयर मी’ प्रश्नांच्या यादीतील टॉप १० जागा पाहा

१. माझ्याजवळ असणारे कोडिंग क्लासेस
२. माझ्याजवळ होणारे भूकंप
३. माझ्याजवळील झुडीओ [Zudio- कपड्यांचे दुकान]
४. माझ्याजवळ साजरा केली जाणारी ओणम साध्या
५. माझ्याजवळचे जेलर सिनेमा लागलेले चित्रपटगृह

हेही वाचा : India ‘Swiggy’d’ in 2023 : २०२३ वर्ल्ड कप फायनलचा दिवस ठरला ‘नॅशनल फूड डे?’ १४ मे, १ जानेवारीला Swiggy च्या ऑर्डर्स पाहून व्हाल चकित…

६. माझ्याजवळील ब्युटी पार्लर
७. माझ्याजवळील जिम
८. माझ्याजवळील रावणदहन ठिकाण
९. माझ्याजवळील त्वचा तज्ज्ञ
१०. माझ्याजवळील खाणावळ

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 near me google search list for year 2023 from beauty parlor to coding classes check out all places dha