Smart Cities Rankings 2024: गेल्या काही वर्षांमध्ये हळू हळू स्मार्ट शहरांची जागतिक परीभाषा बदलत आहे. स्मार्ट शहरांनी फक्त आर्थिकदृष्टया सक्षम होण्यावर भर न देता भविष्यातील येणाऱ्या समस्यांना तोंड देऊ शकतील अशा धोरणांची रचना करणे आणि त्याचा अवलंब करणे देखील आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IMDने नुकतेच जगातील टॉप १० सर्वात स्मार्ट शहरांची यादी जाहीर केली आहे आणि शहरांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या रहिवाशांच्या जीवनमानावर कसा परिणाम करत आहे या निकषानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD)नुसार ” जिथे तंत्रज्ञानाचा वापर करून तेथील लोकांचे जीवन चांगले बनवले जाते आणि शहरीकरणातील उणीवा दूर केल्या जातात असे शहर म्हणजे स्मार्ट शहर”

जगातील टॉप १० सर्वात स्मार्ट शहरांची यादी

  • पहिला क्रमांक – झुरिच स्वित्झर्लंड
  • दुसरा क्रमांक – ओस्लो नॉर्वे
  • तिसरा क्रमांक – कॅनबेरा ऑस्ट्रेलिया
  • चौथा क्रमांक – जिनिव्हा स्वित्झर्लंड
  • पाचवा क्रमांक -सिंगापूर
  • सहावा क्रमांक – कोपनहेगन डेन्मार्क
  • सात क्रमांक – लॉसने स्वित्झर्लंड
  • आठ क्रमांक – लंडन युनायटेड किंगडम
  • नऊ क्रमांक – हेलसिंकी फिनलंड
  • दहावा क्रमांक – अबु धाबी संयुक्त अरब अमिराती

हेही वाचा – जगातील आद्य कला ५१ हजार २०० वर्षे जुनी; नवीन संशोधन काय सांगते?

आयएमडीने एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या २०२४ स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार, युरोप आणि आशियातील स्मार्ट शहरे जागतिक स्तरावर प्रगती करत आहेत, तर उत्तर अमेरिकेतील शहरे या क्रमवारीत घसरली आहेत.

अहवालानुसार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांनी त्यांच्या नागरिकांच्या राहणीमानाची एकूण गुणवत्तेची पूर्तता करणारे उपक्रम विकसित केले आहेत, हिरवेगार परिसर निर्माण करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचा विस्तार करणे आणि सामाजिक संबंधांना प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

याव्यतिरिक्त या देशांनी रँकिंगमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन ठेवून कामगिरी केली आहे. नाविन्यपूर्ण धोरणे म्हणजे प्रतिभावंत लोकांना आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि भौगोलिक असमानतासंबंधी दीर्घकालीन समस्या सोडवणे अशा गोष्टींवरही भर दिल्याचे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा – Meta AI होणार आणखी हुशार; व्हॉट्सॲपवरच करून देणार तुम्हाला फोटो एडिट; पाहा …

जगातील टॉप १० सर्वात स्मार्टच्या यादीत भारतातील एकही शहर नाही?

भारतातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी चार शहरांनी या यादीत स्थान मिळवले आहे असले तरी टॉप १० शहरांच्या यादीमध्ये भारतातील एकही शहराचा उल्लेख केलला नाही. सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये नसले तरी या यादीमध्ये दिल्ली शहर १०६व्या क्रमांकावर, मुंबई शहर १०७व्या क्रमांकावर, बेंगळुरू शहर १०९व्या क्रमांकावर, आणि हैदराबाद शहर १११व्या क्रमांकावर आहे.

भारतातील स्मार्ट सिटी

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, २५ जून २०२५ रोजी राष्ट्रीय स्मार्ट शहरे मिशन (National Smart Cities Mission) सुरू केले. देशभरात नागरिकांसाठी अनुकूल आणि शाश्वत स्मार्ट शहरे विकसित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

मंत्रालयाच्या (१० नोव्हेंबरपर्यंतच्या) आकडेवारीनुसार प्रकल्प पूर्ण करणे, निधी वापरणे आणि इतर निकषांमध्ये सूरत (गुजरात) अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ आग्रा (यूपी), अहमदाबाद (गुजरात), वाराणसी (यूपी) आणि भोपाळ (मप्र) पहिल्या पाचमध्ये समावेश होतो. उर्वरित टॉप १० मध्ये तुमकुरु (कर्नाटक), उदयपूर (राजस्थान), मदुराई (टीएन), कोटा (राजस्थान) आणि शिवमोग्गा (कर्नाटक) यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील शहरे अजूनही मागे आहेत. सर्वात खालच्या क्रमांकावरील १० शहराच्या कावरत्ती (लक्षद्वीप), पुद्दुचेरी, पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार बेट), इम्फाळ (मणिपूर), शिलाँग (मेघालय), दीव, गुवाहाटी (आसाम), ऐझॉल (मिझोरम), गंगटोक (सिक्कीम) आणि पासीघाट (अरुणाचल प्रदेश) यांचा समावेश केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 smartest cities in the world in 2024 where do indian cities rank snk
Show comments