Shopping Topics in Google Trending: डिजिटल इंडिया झाल्यापासून ऑनलाइन खरेदीला लोक जास्त पसंती देताना दिसतायत. प्रत्यक्ष बाजारात जाऊन गर्दीत खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी वेळ आणि श्रम वाचवून एका क्लिकवर लोक शॉपिंग करू लागले आहेत. पण, शॉपिंग करताना लोकांना अनेक प्रश्न पडतात त्याचं उत्तरपण लोक डिजिटल पद्धतीनेच शोधतात.

इंटरनेटवर रोज लाखो विषय ट्रेंडिंग होत असतात. त्यातलाच लोकांच्या जिव्हाळ्याचा शॉपिंग हा एक विषय आहे. पण, या डिजिटल जगात सध्या शॉपिंगसाठी लोक काय सर्च करतायत, नेमका कोणता ट्रेंड (Google Trends) सुरू आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? गेल्या सात दिवसांत भारतात सर्च केलेल्या शॉपिंगच्या कॅटेगरीमधील विषयांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Met Gala Sari 23-Foot did not let Alia Bhatt use the washroom for six hours
२३ फूट लांबीच्या साडीमुळे आलिया भट्ट सहा तास वॉशरुमला गेली नाही; जाणून घ्या, लघवी रोखणे किती धोकादायक आहे?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
IND vs BAN if Kanpur Test washed out due to rain Which team India or Bangladesh will lose
IND vs BAN : कानपूर कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का? जाणून घ्या
Minimum bank balance do you know which bank is charging how much for not maintaining minimum balance sbi hdfc icici pnb axis bank yes bank
Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या
A new serial will be aired on Marathi channels
मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांचा श्रीगणेशा
IND vs BAN old lady video viral after cheering Ashwin
IND vs BAN : अश्विनचा हुरुप वाढवायला आजी सरसावल्या; दिवसभरातल्या प्रत्येक चौकार-षटकाराचं कौतुक, VIDEO व्हायरल
harsh goenka 600 daily saving post
Harsh Goenka Social Post: “दिवसाला ६०० रुपयांची बचत करा”, हर्ष गोएंकांचा सल्ला; नेटिझन्सची आगपाखड, तर नोकरदारांनी मांडला हिशेब!
Boy hold funny poster at lalbaug mumbai video goes viral on social Media
“फक्त गर्दीत हात धरणारी नको…” लालबागमध्ये तरुणाची पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या; असं लिहलंय तरी काय? पाहा VIDEO

गेल्या सात दिवसांत गूगल ट्रेंड्सवर सर्च होणारे टॉप पाच विषय

१. सेंको गोल्ड (Senco Gold)

सेंको गोल्ड (Senco Gold) हा एक प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्ड आहे, जो सोने आणि डायमंड्सच्या दागिन्यांसाठी ओळखला जातो. उच्च दर्जाची गुणवत्ता आणि इनोव्हेटिव्ह डिझाइन्ससाठी हे ब्रॅण्ड भारतात मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते.

हेही वाचा… स्टेजवर महिलेचा डान्स सुरू असताना काकांनी केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

अलीकडेच सेंको गोल्डच्या शेअरच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. २९ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्या शेअरच्या किमतीने १५०० रुपयांपर्यंत मजल मारली आणि त्यामुळे ती एक मिडकॅप कंपनी बनली; ज्याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळेच सेंको गोल्ड हे गूगल ट्रेंडमध्ये आहे.

गूगल ट्रेंड्सचा ग्राफ पाहता, २३ सप्टेंबरपासून याचा सर्च व्हॉल्यूम वाढला आहे; तर २५ व २६ सप्टेंबरदरम्यान याचा सर्च कमी झाला आणि २७ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा याचा सर्च व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ग्राफमधून दिसून येतेय.

२. ई-कार्ट लॉजिस्टिक्स (Ekart logistics)

ई-कार्ट लॉजिस्टिक्स (Ekart logistics) ही एक भारतीय कुरिअर वितरण सेवा कंपनी आहे; जिचे मुख्यालय बंगळुरु, कर्नाटक येथे आहे. ही फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी आहे, जी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जाते. Ekart महिन्याला सुमारे १० दशलक्ष शिपमेंट वितरित करते.

गूगल ट्रेंड्सचा ग्राफ पाहता, २७ सप्टेंबरपासून आजपर्यंत याचा सर्च व्हॉल्यूम वाढला आहे. ई-कार्टचे जवळचे केंद्र ई-कार्ट कस्टमर केअर नंबर पुणे असे प्रश्न लोकांनी गूगलवर सर्च केले आहेत. तसेच जोधपूर, पुणे, कोलकाता येथील लोकांनी जवळपासची ई-कार्ट कंपनी सर्च केली आहे.

३. ई-कार्ट कंपनी (Ekart Company)

ई-कार्ट लॉजिस्टिक्सलाच पुन्हा एकदा ई-कार्ट कंपनी या कीवर्डने सर्च केली जातेय. यात ईकार्ट फॅसिलिटी नीअर मी, ईकार्ट मदर हब पुणे, निअरेस्ट ईकार्ट हब अशा गोष्टी लोकांनी सर्च केल्या आहेत.

४. सॅमसंग गॅलक्सी S-23 (Samsung Galaxy S-23)

Samsung Galaxy S23 सीरीज १७ फेब्रुवारी २०२३ लाँच झाली होती. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत ७४,९९९ रुपये इतकी होती आणि 256GB स्टोरेजसाठी याची किंमत ७९,९९९ रुपये इतकी होती.

सध्या सणासुदीच्या काळात स्मार्टफोन्सवर कंपन्या भरभरून ऑफर्स आणि सूट देत असतात. अशातच आता फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सुरू झाल्याने हा स्मार्टफोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये या स्मार्टफोमवर तब्बल ३२,००० रुपयांची डिस्काउंट मिळत आहे. या फोनच्या 5G व्हेरियंटची किंमत ४२,९९९ रुपये आहे.

५. फ्लिपकार्ट (Flipkart)

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलपासून ही ई-कॉमर्स कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २७ सप्टेंबरपासून या सेलची सुरुवात झाली असून, बिग बिलियन डेज सेल संपण्याची तारीख ६ ऑक्टोबर आहे.

गूगल ट्रेंड्सच्या ग्राफनुसार २५ तारखेपासून फ्लिपकार्टच्या या कीवर्डचा सर्च व्हॉल्यूम वाढला आहे. फ्लिपकार्ट सेलची शेवटची तारीख जास्त सर्च केलीय. फ्लिपकार्ट सेल एण्ड डेट, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज एण्ड डेट, बिग बिलियन डेज २०२४ फ्लिपकार्ट लास्ट डेट अशा प्रकारचे कीवर्ड टाकून लोकांनी आता फ्लिपकार्टच्या या भव्य सेलची अंतिम तारीख सर्च केली आहे.