Top Trending Questions About Diwali: Alphabet आणि Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी रविवारी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या X हँडलवर दिवाळीच्या परंपरांबद्दल नेटकरी शोधत असणाऱ्या टॉप प्रश्नांची यादी सुद्धा शेअर केली. सुंदर पिचाई यांनी एक GIF शेअर करत जगभरात दिवाळीविषयी शोधल्या जाणाऱ्या पाच प्रश्नांविषयी माहिती दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या दिव्याच्या जीआयएफमध्ये पाच अंक दिसतायत. ज्यामध्ये प्रत्येक अंकाला एक प्रश्न जोडण्यात आला आहे. तुम्ही त्या त्या नंबरवर टॅप केल्यास तुम्हाला समोर प्रश्न दिसून येईल.
सुंदर पिचाई यांनी सांगितलं दिवाळीविषयी लोकं गूगलवर काय शोधतायत?
१) भारतीय दिवाळी का साजरी करतात?
२) दिवाळीला रांगोळी का काढायची?
३) आम्ही दिवाळीला दिवे का लावले जातात?
४) दिवाळीला लक्ष्मीपूजन का केले जाते?
५) दिवाळीला अंगाला तेल लावून अभ्यंगस्नान का केले जाते?
दरम्यान, सुंदर पिचाई यांच्या पोस्टला उत्तर देत अनेकांनी नुसत्या दिवाळीच्या शुभेच्छा… Google डूडल नाही? असा उलट प्रश्न केला आहे.
सुंदर पिचाई पोस्ट
दुसरीकडे, अॅपलचे सीईओ टिम कुक यांनीही दिवाळीनिमित्त भारतीयांना शुभेच्छा देण्यासाठी X ला खास पोस्ट केली आहे. AFP फोटो जर्नलिस्ट चंदन खन्ना यांनी आयफोन १५ प्रो मॅक्सने क्लिक केलेला फोटो शेअर करताना टिम कुक यांनी X वर “दिवाळीच्या शुभेच्छा” अशी पोस्ट केली आहे.
अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी गूगलच्या हैदराबाद मधील ऑफिसच्या बांधकामाचा व्हिडीओ शेअर करत हे एक आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रगतीचे चिन्ह आहे व ही खूप मोठी पायरी आहे असे म्हटले होते. आता त्यानंतर जागतिक स्तरावरील बलाढ्य कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देणे हे सुद्धा खास ठरत आहे.