Crocodile video: मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. या व्हिडीओत तुम्ही मगरीला शिकार करताना पाहिलं असेल. कुणीही प्राणी-पक्षी तिच्यासमोर आला की त्याचं वाचणं अशक्यच. मगर त्याच्यावर हल्ला करतेच. अगदी वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणीही जेव्हा पाणी प्यायला जातात तेव्हा ते मगरीच्या भीतीने सावधपणे पाणी पितानाही दिसतात. पण अशाच मगरीच्या समोर अगदी बिनधास्तपणे गेलं ते एक कासव. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सुरु होतो एक भक्ष आणि भक्षक यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष.दोघांमध्ये नेमके कोण जिंकेल? हे तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं
एका कासवाने चक्क मगरीसमोर जाण्याची डेअरिंग केली. आता कासव स्वत:हून मगरीसमोर जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात गेल्यासारखंच आहे. पण इथं मात्र उलटंच घडलं. कासव मगरीजवळ गेलं आणि असं काही घडलं की जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. कासवाने मगरीसोबत जे केलं आणि त्यानंतर मगरीने जी प्रतिक्रिया दिली ते पाहून असंही घडू शकतं, याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कासवाला तोंडात अडकवण्यात मगरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. पण मगर जास्त वेळ कासव तोंडात पडू शकला नाही. यानंतर कासव कसा तरी जीव वाचवण्यासाठी मगरीपासून पळून जातो. दरम्यान, जीवन-मरणाच्या लढाईतही कासव जिंकले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> वाह दीदी वाह! ‘पापा की परी’ स्कुटी पार्क करायला गेली अन् थेट मेडिकलमध्ये घुसली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AMAZlNGNATURE हँडलसह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर दोन हजारांहून अधिक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा व्हिडिओ समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले.