Torture on student by teacher of Madrasa: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे लक्षात आले, ज्यामध्ये एका शाळकरी मुलाला उलटे टांगलेले दाखवले आहे आणि ही घटना भारतातील मदरसा (Madrasa) येथे घडली आहे असा दावा केला गेला होता. याविषयी केल्या गेलेल्या तपासात असे आढळून आले की, हा व्हिडिओ भारताचा नसून पाकिस्तानमधला आहे. व्हायरल झालेले व्हिडीओ फक्त दिशाभूल करणारे आहेत.
काय होत आहे व्हायरल? (Torture on student by teacher of Madras going Viral)
X यूजर Manoj Sharma Lucknow UP ने हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइलवर पोस्ट केला.
या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन इथे पाहा
https://archive.ph/gFavf
इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि रिव्हर्स इमेज सर्चसाठी कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला.
तेव्हा आम्हाला गल्फ टुडेच्या वेबसाइटवर एका बातमीसह दिलेला स्क्रीनशॉट सापडला.
https://www.gulftoday.ae/news/2019/06/28/pakistani-police-solve-the-case-of-boy-hanged-upside-down-beaten-in-seminary
रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे:
पाकिस्तानमधील एका अल्पवयीन मुलाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात या मुलाच्या सेमिनरी शिक्षकानेच त्याला उलटे टांगले आणि मारहाण केली. रावळपिंडी पोलिसांनी या घटनेची दखल घेत शुक्रवारी या भीषण कृत्यात सहभागी असलेल्या शिक्षकाला अटक केली. या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दहशतवादविरोधी विभागाच्या (CTD) कर्मचाऱ्यांनी गुप्तचर संस्थांच्या मदतीने सेमिनरीचा शोध लावला.
२८ जून २०१९ रोजी हा रिपोर्ट अपलोड करण्यात आला होता आणि या रिपोर्टमध्ये ही घटना आदल्या वर्षी हिवाळ्यात रावळपिंडी मध्ये घडल्याचे नमूद केले होते.
इतर माध्यम संस्थांनीही याच घटनेचे वृत्त प्रसिद्ध केले
https://tribune.com.pk/story/2002371/madrassa-teacher-arrested-hanging-minor-boy-upside
रिपोर्ट मध्ये म्हटले आहे: पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की रावळपिंडी सेमिनरीमध्ये एकूण ३० मुले राहत होती, मुलांच्या म्हणण्यांनुसार ही सेमिनरी मुरी येथील एका माणसाची होती.
आम्हाला जिओ टीव्हीवर एक बातमीही मिळाली
https://geo.tv/latest/241861-rawalpindi-qari-who-assaulted-student-sent-on-14-day-judicial-remand
रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: रावळपिंडी येथील कारी नूर मुहम्मद नामक शिक्षण ज्याने विद्यार्थ्याला उलटे बांधले होते आणि त्याच्यावर अत्याचार केला होता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
निष्कर्ष: पाकिस्तानातील एका मदरसात एका अल्पवयीन मुलाला उलट लटकवून मारहाण केली गेली, तो व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा करून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडीओसह केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.