Himachal, Manali Traffic Jam Viral Video : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या यादरम्यानच्या काळात सध्या हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडीचे चित्र आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी एका व्यक्तीने आपली महिंद्रा एसयूव्ही थार नदीत उतरवली.

हे दृश्य चित्रपटातील दृश्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात काही वेगळेच होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहनचालकाला ‘चालान’ देण्यात आले असून, भविष्यात अन्य पर्यटकांकडून असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनाही टॅग केला आहे.

Diwali celebrate in mumbai local video goes viral
मुंबईकरांचा नाद नाय! लोकलमध्ये साजरी केली जबरदस्त दिवाळी; प्रत्येक मुंबईकरानं पाहावा असा VIDEO
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
Congestion at Chitnis Park Chowk raises safety concerns for New English Medium School students
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…

महिंद्रा थार ही भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय एसयूव्ही गाडी आहे; परंतु अशी कारवाई कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन नदीत नेणे धोकादायक तर आहेच; पण त्यामुळे नदीचीही हानी होते. पोलिसांनी कारवाई करीत वाहनचालकाला ‘चालान’ बजावले असून, सुरक्षेसाठी तेथे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्याची ही पद्धत सर्वसामान्यांनाही पसंत पडलेली नाही.

एसपीने जारी केले निवेदन

लाहौल स्पिती पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये लाहौल-स्पिती जिल्ह्यात एक ‘थार’ चंद्रा नदी ओलांडत आहे. आम्ही या व्हिडीओची दखल घेतली आहे आणि मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत या वाहनचालकावर ‘चालान’ची कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तेथे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्स खूप कमेंट्स करीत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्सही जोरदार कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, या वाहनाचा चालक धोकादायक स्टंट करीत असल्याने त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणखी एका युजरने लिहिलेय की, असे स्टंट करण्याऐवजी सावधगिरी बाळगली पाहिजे; जेणेकरून आपल्या पर्वत आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. दरम्यान, एका युजरने हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना टॅग करून लिहिले की, सर, तुमची कार खरोखरच पॉवरफुल आहे.