Tourist in Goa drives XUV with kids sleeping on its roof : गोवा हे भारताच्या नैऋत्य किनार्‍यावर वसलेले ठिकाण जे तेथीव समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य रस्त्यांसाठी ओळखले जाते. वर्षभर पर्यटक येथे भेट देण्यास येतात. पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. दरम्यान सध्या एका सोशल मीडियावर एका पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा पर्यटकाच्या कारवर दोन लहान मुले झोपली होती. एवढंच नव्हे तर कार रस्त्यावरून धावत होती. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकाना धक्का बसला आहे. कोणी असे काय करू शकते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

बुधवारी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स(ट्विटर)वर @InGoa24x7 अकांटउवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ‘पररा कोकोनट ट्री रोड’वर एक पर्यटक एसयूव्ही कार चालवत दिसत आहे आणि कारच्या छतावर दोन मुले झोपलेली दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू आहे. दुसरा माणूस येऊन ड्रायव्हरला थांबवतो आणि मुलांच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल विचारतो. “तुम्ही या मुलांना गाडीवर झोपू देत आहात? मुलं गाडीच्यावर झोपली आहेत!” संबंधित व्यक्ती ड्रायव्हरला उत्तर देतो, “मला वळण घेऊ द्या. नाही नाही, मी रिव्हर्स घेत आहे.”

selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
traffic cop warden booked for demanding bribe to remove car jammer
मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा

मुलांना छतावरून उतरवून गाडीच्या आत घेतले की नाही हे या व्हिडीओमधून समजत नाही. एक्सवर २७ डिसेंबर रोजी पोस्ट करण्याच आलेल्या हा व्हिडीओ १५७०० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहून लोकांना रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा – कोंबड्या चोरण्यासाठी लोकांची उडाली झुंबड! कोणी पोत्यात कोंबल्या तर कोणी हातात घेऊन पळाले; पाहा व्हिडीओ

“पालक इतके निष्काळजी असतात हे पाहून वाईट वाटते. मजेशीर गोष्ट म्हणजे एक निष्काळजी गोष्ट दुसऱ्या निष्काळजीपणाकडे घेऊन जाते. गोवा हे आरामदायी अनुभवासाठी ओळखले जाते जिथे थोडी शिस्तीने वागणे आवश्यक आहे. तसेच मुलांनाही हा चुकीचा संदेश दिला जात आहे. असे निष्काळजीपणे वागणे मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते. आशा आहे की लोक शिस्तीने वागतील”असे एकाने कमेंटमध्ये लिहिले. दुसरा म्हणाला की, “हे काय सुरू आहे आपल्या समाजात?” तिसरा म्हणाला, “पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे कारवाई केली पाहिजे.” अनेकांनी गोवा पोलिसांनी संबधीत व्यकीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंतीही केली.

हेही वाचा – आजीला भेटायला निघाला होता ६ वर्षाचा मुलगा; एअरलाइन्सच्या चूकीमुळे पोहचला भलत्याच ठिकाणी, तेही १६० मैल दूर

अलीकडच्या काळात पर्यटकांना त्यांच्या बेपर्वा वागण्याने त्रास होतो. अशा घटना घडल्या आहेत की पर्यटकांनी त्यांच्या कार समुद्रकिनाऱ्यावर नेल्या आणि अडकले. शिवाय, गोव्याच्या विविध भागांमध्ये पर्यटक दारू पिऊन गाडी चालवताना आणि बेपर्वाईने वाहन चालवताना पकडले गेले आहेत.