Tourists Fighting In Ganga River : ऋषिकेश हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मोठ्या संख्येने लोक धार्मिक विधीसाठी येथे येतात. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋषिकेश हे पर्यटनस्थळ म्हणून देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ऋषिकेशच्या गंगा नदी काठावर अमली पदार्थांचे सेवन आणि अश्लीलतेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या विरोधात आता पोलिसांकडून ऑपरेशन मेरीडा अंतर्गत कारवाई केली जात आहे. अशातच रिव्हर राफ्टिंगवरून पर्यटक, गाईड आणि राफ्टिंग व्यावसायिकांमध्ये झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटक रिव्हर राफ्टिंगच्या स्टीकने एकमेकांना मारताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषिकेशच्या पवित्र गंगेच्या काठी अनेक पर्यटक शांतता अनुभवण्यासाठी येतात. मात्र, या घटनेमुळे या ठिकाणी अशांतता पसरली आहे. अनेकांनी व्हिडीओतील घटना पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, शिवपुरीच्या गंगेच्या काठी रिव्हर राफ्टिंगसाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, याचवेळी काही पर्यटक एकमेकांना राफ्टिंग स्टीकने जोरजोरात मारत आहेत. राफ्टिंग बोटमधून बाहेर पडल्यानंतर पर्यटक एकमेकांना मारत होते. इतकेच नाही तर तिथून पळ काढणाऱ्या पर्यटकांच्या मागे पळत जावून त्यांना मारहाण केली जात होती. ही मारामारी कोणत्या कारणावरून झाली आणि एकमेकांना मारणारे हे लोक कोण होते, हे स्पष्ट समजू शकलेले नाही. मात्र, यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेला राफ्टिंग गाईडही या हाणामारीचा बळी ठरला असे सांगितले जात आहे. वाद केवळ शाब्दिक नव्हता, पर्यटक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारतानाही दिसत होते.

गंगेच्या काठी अर्धनग्न अवस्थेत विदेशी नागरिकांची मज्जा मस्ती, VIDEO पाहून संतापले युजर्स; म्हणाले, “गोवा बीच नाही…”

दर आठवड्याच्या शेवटी हजारो पर्यटक सुंदर दृश्यांचा तसेच साहसी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ऋषिकेशच्या गंगा नदी काठावर येत असतात. मात्र, अशा काही समाजकंटकांमुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्राचे वातावरणही बिघडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेकांनी संबंधित लोकांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists created ruckus in rishikesh ganga river violent fight breaks out among tourists during river rafting in rishikesh sjr