Viral video: रणरणत्या उन्हाळ्यानंतर पाऊस सुरू झाला की पाणी, हिरवळ आणि डोंगरप्रेमी पर्यटक व ट्रेकर… त्यातही नवाट ट्रेकर मंडळींच्या इच्छा आणि पावलांना धुमारे फुटतात. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येईल तो शनिवार-रविवार ट्रेक, अॅडव्हेंचर करावंस वाटतं. अनेकांनी या विकेंडला ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन केले असतील. मात्र, त्या आधी देहाराडूनला गुच्छूपानी या ठिकाणी पर्यटकांच्या झालेल्या कोंडीचा हा व्हिडीओ पाहा. ट्रेकर्सच्या गर्दीचा हा व्हिडीओ बघून तुम्ही विकेंडचा प्लॅन नक्की कॅन्सल कराल.

विकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय?

Mumbai tempo driver and traffic police dispute over clicking picture of vehicle video viral
“कोणाला विचारून फोटो काढला?”, कांदिवलीत टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसांना विचारला जाब, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ambedkar statue vandalism Ludhiana protest fact check
अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, निषेधार्थ हजारो लोक उतरले रस्त्यावर; मोर्चाचा VIDEO होतोय व्हायरल? पण, सत्य काय वाचा
funny video the boys going on a scooty took the smoke lightly
रस्त्यावर धूरच धूर, तरुण स्कुटी घेऊन पुढे गेला अन् घडलं असं काही की…; Viral Video पाहून पोट धरून हसाल
Robbery Viral Video
“१० रुपयांच्या नादात गमावले हजारो रुपये” कारचालकांनो व्हा सावध! तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना; पाहा धक्कादायक VIDEO
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
funny Republic Day Speech
Video : “२६ जानेवारी २५ जानेवारी नंतर येतो” चिमुकल्याच्या भाषणाने केला एकच दंगा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
In pune Controversy over Rs 5 ticket in bus; See what the young man did on the road video goes viral on social media
वाढीव पुणेकर! बसमध्ये ५ रुपयांच्या तिकिटवरुन वाद; तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “झुकेगा नही साला”

रॉबर्स केव्ह हे एक पर्यटन स्थळ आहे, जे स्थानिक लोकांमध्ये गुच्छूपानी म्हणून प्रसिद्ध आहे. या पूर्वीच्या काळातील लुटारूंच्या जुन्या गुहा होत्या, ज्या आता लोकांच्या भेटीचे ठिकाण बनल्या आहेत. या गुहांमधील थंड पाण्यात चालणे प्रत्येकाला हवंहवंस वाटतं. त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी आता पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून कुणीही या ठिकाणी जाण्याचं धाडस करणार नाही. पावसाळा सुरू झाली की पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची अफाट गर्दी येथे होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पर्यटक, ट्रेकर्सची इतकी गर्दी आहे की कितीतरी वेळ सर्व जण एकाच ठिकाणी उभे आहेत. अक्षरशः पाऊल ठेवायला जागादेखील नसल्याचं या व्हिडीओमधून समोर आलेलं आहे. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही.

सगळे प्लॅन कराल रद्द

असंच चित्र दरवर्षी बघायला मिळतं. गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलिसदेखील अशा ठिकाणी असणे गरजेचे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे. हिमाचल प्रदेशातील अनेक पर्यटन स्थळांवर जायचे मार्ग, रस्ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नाद पाहिजे ओ, नादाशिवाय काय हाय, तरुणांनो आजोबांची पैलवानकी एकदा बघाच; VIDEO पाहून व्हाल अवाक्

हा व्हिडीओ uttarakhandwala या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एकाने म्हटले आहे की, “प्रशासन झोपले आहे का? अशा पर्यावरणाच्या ठिकाणी एवढ्या प्रचंड गर्दीला परवानगी देणे चुकीचे आहे.” तर दुसऱ्या एकाने, “तुम्ही पर्यटनाला अशा प्रकारे प्रोत्साहन का देता?” असा सवाल केलाय. जून ते ऑगस्ट कालावधीत तुम्ही ट्रेक करू इच्छित असाल, पावसाळ्यामध्ये भटकंतीला जावू इच्छित असाल तर विकेंडला कधीही प्लॅनिंग करू नका.

Story img Loader