इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपण विसरून जातो; तर काही व्हिडीओ कायमचे लक्षात राहतात. काही व्हिडीओ असे असतात; जे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच दमछाक होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही थरकाप भरेल आणि हे कसं झालं, याचा तुम्ही विचार करीत राहाल.
सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे कोणत्या तरी समुद्रातील एका दुर्घटनेचा आहे. समुद्राच्या जोरदार लाटांचा आनंद अनेकांना घ्यायचा असतो. पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहीतच आहे; पण कधी कधी त्यामुळे विनाशही ओढवू शकतो. ते लक्षात घेऊन समुद्रकिनारी आणि समुद्रात जाताना काळजी घ्यायला हवी. बोटीतून प्रवास करताना तर नेहमीच यासंबंधी सावधगिरीचा इशारा दिला जातो. सध्या अशा स्वरूपाची एक दुर्घटना दाखवून देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. काही पर्यटक लाटांचा आनंद घेत होते, मात्र, काहीच क्षणांत त्यांच्या आनंदावर विरजण पडलं.
या व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, काही पर्यटक समुद्रात फिरायला गेले होते. खवळलेल्या या समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही पर्यटक समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी बोटीत बसलेत खरे; मात्र काही सेकंदांनंतर त्यांना समुद्राच्या धोकादायक लाटांचा सामना करावा लागला. मात्र, यादरम्यान प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात अचानक उलटली. लाटा इतक्या धोकादायक होत्या की, बोट उलटून त्याचे दोन तुकडे झाले. हा धोकादायक व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या बोटीत सुमारे १५ ते २० पर्यटक असून, एक माणूस त्यावर नियंत्रण ठेवताना दिसतोय. बोट बुडाल्यानंतर हे सर्व जण समुद्रात पोहताना दिसले. यात कोणती जिवितहानी झाली की नाही, याबद्दल माहिती मिळू शकली नाही.
(हे ही वाचा: महिलांनो, आता भाजी बनविण्याची झंझट संपली! बाजारात आली स्वयंपाक बनविणारी मशीन, Video पाहून तुम्हीही व्हाल आनंदी)
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर laughtercolours नावाच्या युजरने शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल. हे धोकादायक दृश्य पाहिल्यानंतर लोक घाबरले आणि बोटीवरील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करू लागले. कमेंट करताना एका युजरने लिहिले, “आशा आहे की, ते सर्व जिवंत आणि सुरक्षित असतील.”