‘जाना था जापान पहुँच गए चीन, समझ गए ना’ हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. जपान फिरायला आलेल्या पर्यटकांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. या पर्यटकांना जपानमधील एका थीम पार्कमध्ये जायचे होते. मात्र, वाट चुकल्यामुळे हे कर्मचारी थीम पार्कऐवजी उकिरड्यात जाऊन पोहोचले.

पाहा कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीत LinkedIn च्या सीईओंनी नेमकं काय केलं

जपानमध्ये आलेल्या पर्यटकांना युनिर्व्हसल स्टुडिओला भेट देण्यासाठी जायचं होतं. पण ओकासामध्ये असलेली एक इमारत पाहून ते संभ्रमात पडले. कारण त्या इमारतीची रचना एखाद्या थीम पार्कप्रमाणचे होती. पर्यावरण, कला आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधून ती बांधण्यात आली होती. वास्तविक पाहता थीम पार्कप्रमाणे दिसणाऱ्या या इमारतीत दिवसाला हजारो टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पण या इमारतीची सुंदर रचना पाहता येथे दरदिवशी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. त्यामुळे या पर्यटकांचा गैरसमज झाल्याची शक्यता आहे. अचानक या ठिकाणी धडकलेल्या पर्यटकांमुळे इथले कर्मचारीही काही वेळासाठी गोंधळले होते.

Video : चाहत्यांना चुकवण्यासाठी विमानात धोनीला करावी लागली कसरत

Story img Loader