सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये पाळीव प्राण्यांचे गोंडस रूप दाखवणारेही काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा चक्क अभिनय करत असल्याचे दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये घरात खेळणाऱ्या एका कुत्र्यासमोर खेळण्यामधली गाडी येते, जी त्याचा पायाला धडकते. पण ती गाडी धडकल्याचे हा कुत्रा भासवतो, तसा अभिनय करत तो चक्क लंगडत चालु लागतो. इतकेच नाही तर तो थोडी पावलं चालून जमिनीवर पडल्याचाही अभिनय करतो. ही प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ:
या कुत्र्याच्या या गोंडस अभिनयाने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, नेटकऱ्यांनी या अभिनयाला ‘ऑस्कर पुरस्कार देण्यात यावा’ अशी मागणी केली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.