भारतात क्रिएटिव्ह लोकांची संख्या कमी नाही हे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून अनेकदा दिसून येते. कितीही अवघड काम असले तरी ते सोपे कसे होईल यासाठी ते वेगवेगळा जुगाड करीत असतात. हे जुगाड अनेकदा खरोखर खूप फायदेशीरही असतात. कारण- त्यामुळे कामही सोपे होते आणि वेळही वाचतो. सध्या असाच एक अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे; ज्यामध्ये अधिक माल वाहून नेण्यासाठी एक व्यक्ती ट्रॅक्टरच्या मागे इतक्या ट्रॉली बांधतो की, ज्या पाहून प्रश्न पडतो की, हा नक्की ट्रॅक्टर आहे की रेल्वेची मालगाडी. त्यातून हजारो टन ऊस एकाच वेळी वाहून नेला जात आहे.
ट्रॅक्टर नाही, तर रेल्वेची मालगाडी!
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात ऊस वाहून नेण्यासाठी व्यक्तीने केलेला जुगाड पाहून लोकही थक्क झालेत. त्यात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात ऊस एकाच वेळी नेण्यासाठी ट्रॅक्टरला एकामागून एक ट्रॉली जोडत जाते. इंधन आणि वेळ दोन्ही वाचवण्यासाठी त्या व्यक्तीने हा जुगाड केल्याचे उघड आहे. पण, हे पाहताना ट्रॅक्टर नाही तर ती रेल्वेची मालगाडी दिसते. काहीही म्हणा; पण व्यक्तीचा हा जुगाड पाहून तुमचेही डोके नक्कीच गरगरले असेल.
ट्रॅक्टरचालकाच्या जुगाडने लोक झाले चकित!
हा व्हिडीओ अंकित कुमार अवस्थी नावाच्या युजरने एक्सवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एक एकटा! लोक या व्हिडीओला खूप पसंत करीत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले- हे पाहून प्रत्येकाला नक्कीच आश्चर्य वाटेल; पण ते अपघाताचे कारण ठरू शकते. दुसर्याने लिहिल – एकटाच सर्वांपेक्षा भारी आहे. तिसर्याने मजेशीरपणे लिहिले- यामुळेच रेल्वेला तोटा सहन करावा लागत आहे. नवीन भारताचा नवा ट्रॅक्टर. तसेच इतर अनेकांनी ट्रॅक्टरमालकाच्या या जुगाडाचे कौतुक केले आहे.