Mumbai police video: एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मुंबई पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. दरम्यान दुचाकी चालवताना पोलिसांनी मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक केल्यानंतर मुंबईकरांनी विरोध केला होता. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.
आपल्यापैकी जवळ-जवळ सर्वच लोकांना वाहतुकीचे नियम माहितच असतील. आपण त्यांपैकी एक जरी नियम मोडले तर ट्राफिक पोलिस आपलंच चलान कापतात. तर काही केसमध्ये वाहन चालकाचं लायसन्स देखील रद्द होऊ शकतं. खरंतर सगळे लोक ट्राफिकचे सर्व नियम पाळतात की, नाही हे पाहण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी देखील लावली जाते.यामध्ये हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपलिंग राईड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय जर कोणताही वाहन चालक ट्राफिक पोलिसांच्या हाती लागला, तर त्यांना चलान भरावा लागणार हे निश्चित. परंतु पोलिसच जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर?
मुंबईतील वांद्रे येथे एक ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल धोकादायकपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मुंबईतील वाहतूक पोलीस हवालदार मुंबईत दिवसा महामार्गावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांतील एक हवालदार वांद्रे येथील उड्डाणपुलावरून चुकीच्या दिशेने जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> चक्क खोल विहिरीच्या मधोमध कपलचा रोमान्स; VIDEO व्हायरल होताच नेटिझन्सचा संताप
या व्हिडीओवरती लोक भरभरुन कमेंट्स करत आहेत. तर असे अनेक लोक आहेत, जे या व्हिडीओला शेअर आणि लाईक्स करत आहेत. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.