ऊन असो वा पाऊस…परिस्थिती कशीही असली तर रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियंत्रण करत आपलं कर्तव्य चोख पार पाडण्यात ट्रॅफिक पोलीस नेहमीच तयार असतात. मग रस्त्यावर एखादी गाडी बंद पडली तरी गाडीला धक्का देऊन रस्ता मोकळा करून देणं असो किंवा मग रस्ता क्रॉस करणाऱ्या वृद्ध अपंगाना मदत करणे असो. ट्रॅफिक पोलीस त्यांची ड्यूटी इमानेइतबारे निभवतातच. अशाच एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या ट्रॅफिक पोलिसाने आपला जीव धोक्यात घालून रिक्षामधून पडलेल्या बाळाला वाचवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा या ट्रॅफिक पोलिसाला सलाम ठोकाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक ट्रॅफिक पोलिस रस्त्यावर उभं राहून रस्त्यावरची वाहतूक नियंत्रित करत होता. त्याचवेळी समोरून एक रिक्षा टर्न घेताना दिसून येतेय. रिक्षा टर्न घेत असताना अचानक आत बसलेल्या आईच्या मांडीवरून ते लहान बाळ रस्त्यावर पडतं. हे पाहून ट्रॅफिक पोलीस प्रसंगावधान दाखवत त्या लहन बाळाच्या मदतीला धावून येतो. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या गाड्यांचीही पर्वा न करता हा ट्रॅफिक पोलीस धावत जाऊन बाळा रस्त्यावरून उचलतो.

आणखी वाचा : ताज हॉटेलसमोर ‘Bamb Aagya’ गाण्यावर तरूणीने केला डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले…

या व्हिडीओमध्ये बस या ट्रॅफिक पोलिसाच्या अगदी जवळ आली होती. सुदैवाने या घटनेत बस चालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने ट्रॅफिक पोलीस आणि सोबत लहान बाळ दोघे सुखरूप आहेत.  अनेकदा वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं की तो लाच घेणार, असा सर्वसाधारण समज असतो. पण सगळेच पोलीस तसे नसतात. काही जण आपल्या कामामुळे आणि स्वभावामुळे जगापेक्षा वेगळे ठरतात. अशाच या ट्रॅफिक पोलिसाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय.

आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’ने आकाशात उंचावर उडी घेत केला स्टंट पण…; खतरनाक VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! अजबच…चक्क बकरीसोबत केलं लग्न, घेतली सोबत जगण्या मरण्याची शपथ!

सुंदर लाल असे वाहतूक पोलिसाचे नाव असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण या ट्रॅफिक पोलिसाला सलाम ठोकताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर तो इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic cop saves child from fatal accident in viral video internet lauds his bravery prp