अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर १० मे रोजी भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. याच वेळी बद्रीनाथ धामचे दरवाजे १२ मे रोजी उघडले आणि हेमकुंड साहिबचे दरवाजे २५ मे रोजी उघडण्यात आले. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात. अनेक शिवभक्तांची ही ठिकाणे अगदीच आवडती आहेत. त्यामुळे लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. केदारनाथला जाण्याच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसते आहे. डोगरदऱ्यांच्या कडेला गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. पण, तपासानुसार हा स्क्रीनशॉट दिशाभूल करणारा आहे, असे दिसून येत आहे. काय आहे या व्हिडीओमागील सत्य लेखातून जाणून घेऊ सविस्तर.

काय होत आहे व्हायरल?

Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
The extraordinary dance of foreign youths
‘सोनी कितनी सोनी आज तू लगती वे…’ गाण्यावर मुंबईतील रस्त्यावर परदेशातील तरुणांचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
Elderly Man Narrowly Escapes Death Before Vande Bharat Swooshes By shocking video
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले
indian railway food video Bhel seller cutting onions on ground near bathroom of train watch this disgusting viral video
किळसवाणा प्रकार! तुम्हीही रेल्वेतील चटपटीत भेळ खाताय? विक्रेत्यानं टॉयलेटच्या बाजूला काय केलं पाहा; Video पाहून झोप उडेल

सोशल मीडियावर इन्स्टाग्राम युजर @kedarnathlive_ ने एक व्हिडीओ शेअर केला आणि हॅशटॅगमध्ये केदारनाथ असे नमूद केले. तसेच व्हिडीओवर मजकूर लिहिला आहे की, केदारनाथला जाण्यासाठी रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरून शेअर करत आहेत.

https://www.facebook.com/photo/?fbid=7625168580905842&set=a.2011960305560059

तपास:

व्हिडीओचा इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. याद्वारे आम्हाला ट्रिब्यून इंडियाच्या वेबसाइटवर एक जुनी बातमी दिसली.

https://www.tribuneindia.com/news/himachal/himachal-govt-warns-against-23-second-viral-fake-video-of-tourists-returning-home-after-kinnaur-landslide-288948

बातमीचा अहवाल व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल होता. त्यात नमूद करण्यात आले होते, ‘हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खल झाल्यानंतर नऊ लोकांचा बळी गेला. हिमाचल प्रदेशातून परतणाऱ्या पर्यटकांचा २३ सेकंदांचा व्हायरल झालेला ट्रॅफिक व्हिडीओ खोटा आहे.’ ही बातमी २०२१ साली प्रकाशित झाली होती.

आम्हाला हा व्हिडीओ फेसबुक पेज ‘Halaat Updates’ वर आढळला, हा व्हिडीओ २५ जुलै, २०२१ रोजी पोस्ट केला होता.

https://www.facebook.com/share/v/QQS26HATEzTzR9BH/

कॅप्शन मध्ये म्हंटले होते : This is probably the worst Traffic jam in Kaghan Valley, people are stuck there from 2 to 3 days now facing Fuel & food problem, thousands of people entered for eid celebrations & still stucked ..

म्हणजेच काघन खोऱ्यातील (काघन व्हॅली ही पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा राज्यातील बालाकोट तहसीलमधील एक अल्पाइन दरी आहे). हे कदाचित सर्वांत भीषण ट्रॅफिक जाम आहे. लोक येथे दोन ते तीन दिवस अडकून पडले आहेत. आता त्यांना इंधन आणि अन्नाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हजारो लोक ईद साजरी करण्यासाठी दाखल झाले आणि अजूनही ते तेथे अडकले आहेत…

आम्हाला या व्हिडीओचा स्क्रीनशॉट पाकिस्तानच्या एका न्यूज वेबसाइटवर मिळाला आहे.

Massive traffic jams as millions throng Kaghan valley on Eid

२६ जुलै २०२१ रोजीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, ‘खैबर पख्तुनख्वाच्या मानसेरा जिल्ह्यातील काघान खोऱ्यात, ईद उल अजहाला पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. निसर्गरम्य पर्यटनस्थळावर ट्रॅफिक जाम झाले आहे. टीव्ही चॅनेलने असे वृत्त दिले होते.

आम्हाला ARY Newsच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडला. २६ जुलै २०२४ रोजी अपलोड केलेल्या व्हिडीओचे शीर्षक होते : रस्ते अडवले, हॉटेल्स भरली, पर्यटक काघनच्या दिशेने रस्त्यावर अडकले….

ARY News हे एक पाकिस्तानी न्यूज चॅनेल आहे जे २०२४ साली सुरु झाले होते.

निष्कर्ष: काघन व्हॅली, पाकिस्तानचा हा जुना व्हिडीओ केदारनाथला जातानाच्या वाहतूक कोंडीचा आहे, असे सांगून तो पुन्हा समोर आणला गेला आहे. व्हायरल केलेले दावे खोटे आहेत आणि दिशाभूल करणारे आहेत, असे आमच्या तपासातून समोर आले आहे..