Pune shopping rush video: दिवाळी हा दिव्यांचा सण. हा फक्त उत्सव किंवा कौटुंबिक सोहळा नसून या सणात खरेदीलाही भारतात तितकेच महत्त्व आहे. दिवाळीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीनुसार पुण्यात बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तुडुंब गर्दी उसळली होती. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळी सणाकरिता नागरिक कपडे, कंदील, विद्युत दिवे, पणत्या, रांगोळी असे साहित्य खरेदी करतात. यामुळे दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच दिवाळी साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत येते आणि त्या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येतात. अशातच पुण्यातल्या मंडईतला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पुण्यात खरेदीसाठी जाताना शंभर वेळा विचार कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, मंडई परिसरात झुंबड उडाली. गर्दीमुळे बाजीराव रस्ता, शनिपार, मंडई, तसेच शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी अनेक जण मोटारीतून आले होते. खरेदीसाठी गर्दी झाल्याने मध्य भागातील गल्ली-बोळातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मंडई, शनिपार परिसरात उटणे, आकाशकंदील, पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. बुधवार पेठेतील पासोड्या मंदिराजवळील विद्युत साहित्य विक्री करणारी दुकाने रोषणाईने उजळली होती. अनेक जण सहकुटुंब मध्य भागात खरेदीसाठी आले होते. बाजीराव रस्ता, मंडई, शनिपार, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नागरिकांची किती गर्दी आहे. लोकांना व्यवस्थित चालायलाही जमत नाहीये एवढी गर्दी दिसत आहे. शहरातील रस्तेही विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. या विद्युत रोषणाईमुळे तसेच दुकानांची सजावट पाहून नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह वाढला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कोल्हापूर म्हणजे नादच खुळा! आजी अन् आजोबा हलगीवर जबरदस्त थिरकले; एका VIDEO मुळे झाले फेमस

सोशल मीडियावर हा व्हिडीओ komalllii नावाच्या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता पुणेकरांनाही खरेदीसाठी बाहेर पडायला भीती वाटत आहे. यावर पुणेकरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “लाडकी बहीण योजनेमुळे या वर्षी दिवाळीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी”, तर आणखी एकानं “पुणे तिथे काय उणे” असं म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in pune city due rush for diwali 2024 shopping shocking video viral srk