Traffic Jam on Mount Everest: जगातील सर्वात उंच शिखर सर करम्यासाठी दरवर्षी शेकडो गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्टला भेट देतात यंदा अनेकांना वेगळा अनुभव आला आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघालेल्या अनेक गिर्यारोहक यंदा लांबच लांब रांगेत अडकले आहेत. बर्फाने वेढलेल्या पर्वत रांगमध्ये गिर्यरोहक लांब रांगेत थांबलेले दिसत आहे. फॉक्स वेदरच्या वृत्तानुसार, गिर्यारोहकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजन द्विवेदी नावाच्या एका वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे, “माउंट एव्हरेस्ट चढणे ही विनोद करण्याची गोष्ट नाही आणि खरं तर एक अवघड चढाई आहे.”
द्विवेदी यांनी २० मेचा पोस्ट केला आहे जिथे ते शिखर सर करण्याचा प्रयत्न करत असलेल्या डझनभर गिर्यारोहकांसह एकाच रांगेत थांबले होते “बर्फाने वेढलेल्या पर्वत रांगामध्ये एका दोरीच्या रेषेच्या मदतीने गिर्यारोहक चढाई करत आहे. एव्हेरस्टवर चढाई करणाऱ्या आणि सर करून खाली येणाऱ्यांच्या गर्दी दिसत आहे.” असे त्याने सांगितले.
हेही वाचा – “तो आला, फोन खेचला अन् पळून गेला”, दिल्ली बसमधील चोरीची घटना CCTVमध्ये कैद, Video Viral
जेट प्रवाह हे पृथ्वीच्या वातावरणात वेगाने वाहणारे हवेचे प्रवाह आहेत. समुद्रसपाटीपासून २९,००० फूट उंचीवर जेट प्रवाहाजवळ (jet stream) माउंट एव्हरेस्ट आहे. द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा जेट प्रवाह पर्वतावरून मागे सरकतो तेव्हा गिर्यारोहकांनी अनुकूल हवामानाची प्रतीक्षा केली पाहिजे. अन्यथा, शिखरावर वाऱ्याचा वेग १००-२४९ mph पर्यंत पोहोचू शकतो.
द्विवेदी यांनी त्यांचा स्वतःचा त्रासदायक अनुभव सांगितला. जेव्हा योग्य आणि सुरक्षित हवामानाची परिस्थितीचा फायदा घेत चढाईच्या करणाऱ्यांच्या मोठ्या रांग वाढत गेली तेव्हाचा तो एक भयानक आणि थकवणारा अग्नीपरीक्षा देणारा अनुभव होता असे ते म्हणाले.
एव्हरेस्टवरील गर्दी ही अनेक वर्षांपासून समस्या बनली आहे परंतु जगातील सर्वात मोठा पर्वत अलीकडच्या काळात अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पर्वतावर वारंवार अपघात आणि मृत्यू होऊनही एव्हरेस्टची लोकप्रियता कमी झालेली नाही. या क्षणी गिर्यारोहणाचासाठी शेकडो गिर्यारोहक हिलरी स्टेपच्या शेजारी अडकले आहेत, असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.
“या गिर्यारोहण हंगामाच्या सुरुवातीला पाच लोक मृत आढळल्याच्या घटनेनंतर काही दिवसांनी इतर तीन बेपत्ता झाल्याचे समोर आले “असे न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे.
पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावर ढगांच्यावर, गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर कठीण ट्रेक करत आहेत. हिवाळा आणि उन्हाळा दरम्यान वर्षाचा हंगामात एप्रिल ते मे पर्यंत हा काळ चढाईसाठी सर्वोत्तम वेळ आहे. हवामान स्वच्छ आणि कमी वारे असते परंतु सुरक्षिततेची हमी दिली जात नाही.
यंदा गिर्यारोहण हंगामाच्या सुरुवातीपासून किमान पाच लोक मरण पावले आहेत आणि इतर तीन बेपत्ता झाले आहेत, अधिकाऱ्यांनी सांगितले. गिर्यारोहणाच्या लोकप्रियतेमुळे अलिकडच्या वर्षांत चिंता निर्माण झाली आहे की गर्दी, स्पर्धा आणि धाडसी गिर्यारोहकांची अपुरी तपासणी याला आणखी धोकादायक बनवत आहे.