Drunk Man Viral Video: लग्न सोहळ्यात किंवा हळदी समारंभात दारूच्या नशेची झिंग चढल्यावर काही जण बेभान होऊन नाचताना दिसतात. रस्त्यावरून जात असताना किंवा एखाद्या हॉटेलमधून बाहेर पडल्यावर काही जण दारुच्या नशेत टुल्ल होऊन भन्नाट काहीतरी करताना दिसत असतात. सोशल मीडियावर दारुड्यांनी केलेल्या विचित्र गोष्टी नेहमीच व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. तेलंगणाच्या सिद्धीपेट परिसरात एक दारुड्या रस्त्यावर लावलेल्या मोठ्या होर्डिंगला लटकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दारुच्या नशेत टुल्ल असलेल्या या तरुणामुंळ रस्त्यावर लोकांची एकच गर्दी जमली होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

दारुच्या नशेत टुल्ल झालेल्या तरुणाने धिंगाणा घातल्यावर पोलिसांना कळलं, त्यानंतर…

दारुड्यानं भर रस्त्यातच केलेला भन्नाट प्रकार पाहून सर्वांना आश्चर्याच धक्का बसला. होर्डिंगला लटकल्यानंतर सिद्धीपेट परिसरात वाहतुककोंडी झाली होती. हा तरुण दारुच्या नशेत होता, सार्वजनिक ठिकाणी दारुड्याने धिंगाणा घातल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. सिद्धिपेटच्या पोलीस आयु्क्त एन. श्वेता यांनी दिलेली माहिती अशी की,” हा तरुणी नशेत होता. ही घटना सायंकाळी घडली होती. तो पूर्णपणे नशेत टुल्ल झाला होता. त्या तरुणाला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर त्याला कुटुंबीयांसोबत घरी पाठवण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा केल्याने आम्ही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.”

नक्की वाचा – कुठल्याही प्रकारच्या शारिरीक संपर्कास बंदी; शाळेच्या फतव्यावरून नाराजी

इथे पाहा व्हिडीओ

दारुच्या नशेत काही माणसं इतकी टुल्ल होतात की, त्यांना आपण काय करतोय, याचं भानच राहिलेलं नसतं. बेभान झालेली अशी माणसं दारुच्या व्यसनामुळं सार्वजनिक ठिकाणी अश्लील वागण्याचा प्रयत्नही करतात. अशाप्रकारच्या अनेक घटना व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. तेलंगणामध्येही या दारुड्याने भर रस्त्यात होर्डिंगला लटकून धिंगाणा घातला. त्याच्या अशा वर्तणूकीमुळं नागरिकांसह वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. तेलंगणातील सामाजिक कार्यकर्ता मारुतीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. “सिद्धीपेटमध्ये अशी परिस्थिती आहे.” असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

Story img Loader