Traffic Police And Bikers Video : बाईक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. पण, अनेक जण वाहतुकीचे हे नियम धाब्यावर बसवून विनाहेल्मेट बाईक चालवतात. अशावेळी नियम तोडणाऱ्या चालकांना पकडण्यासाठी नाक्या-नाक्यावर ट्रॅफिक पोलिस सज्जच असतात. तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल, विनाहेल्मेट बाईक चालवणाऱ्यांना ट्रॅफिक पोलिस कसे रस्त्याच्या बाजूला थांबवून दंड वसूल करतात. सध्या अशाच एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण खूप वेगळं आणि भारी आहे. कारण यात ट्रॅफिक पोलिस ना कोणाकडून दंड वसूल करतायत ना कोणावर कारवाई. यात एक ट्रॅफिक पोलिस जे काही करतोय ते पाहून तुम्हीही म्हणाल, ट्रॅफिक पोलिसाचा हा आतापर्यंतचा सर्वात भारी VIDEO आहे.

तुम्ही पाहिलं असेल की, तरुणांना बाईकचं खूप वेड असतं. चारचाकी गाड्यांपेक्षा त्यांचं बाईकवर जास्त प्रेम दिसून येतं. अशावेळी ते आवडत्या बाईकसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि सगळीकडे रुबाबात फिरतात. दरम्यान, आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाचे बाईक प्रेम दिसून आले. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन बाईकस्वारांना या ट्रॅफिक पोलिसाने थांबवलं आणि चक्क त्यांच्या बाईकविषयी चौकशी केली.

ट्रॅफिक पोलिसाचे हे बाईक प्रेम पाहून थबकले तरुण

पोलिसाचे हे बाईक प्रेम पाहून तरुणही थबकले, कारण आत्तापर्यंत पोलिस फक्त नियम मोडले म्हणून चलान फाडण्यासाठी थांबवतात हे अनुभवलं होतं, पण एक ट्रॅफिक पोलिस चक्क त्यांच्या बाईकविषयी चौकशी करायला थांबवतोय हे पाहून त्यांनाही सुखद धक्का बसला. हा व्हिडीओ वाशी महानगरपालिकेजवळच्या सिग्लनजवळील असल्याचे सांगितलं जात आहे.

बाईकची किंमत ऐकून ट्रॅफिक पोलिसही चक्रावतो

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून दोन बाईकस्वार स्पोर्टस बाईक घेऊन जात होते. यावेळी सिग्नलवर ड्युटी करणारे एक ट्रॅफिक पोलिस त्या दोघांना थांबवतो. बाईकस्वार थांबताच पोलिस त्यांच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला की, तुमची गाडी बघायची होती म्हणून थांबवलं. हे ऐकून बाईकस्वारदेखील हसतात. यानंतर ट्रॅफिक पोलिस त्यांना हे कोणतं मॉडल आहे अशी विचारणा करतात, ज्यावर एक बाईकस्वार उत्तर देतो की, हे BMW 850. यानंतर किंमत विचारतात, ज्यावर बाईकस्वार उत्तर देतो, १९ लाख… किंमत ऐकताच ट्रॅफिक पोलिसही चक्रावतो आणि बाबा, म्हणत हसत तोंडावर हात ठेवतो.

यानंतर तो बाईकस्वारांशी मजेत गप्पा मारत म्हणतो की, ही बाईक हायवेला म्हणजे एकदम झापझूप नेत असाल. ज्यावर बाईकस्वार म्हणतो, एकदम सुसाट कार्यक्रम आहे, पण आम्ही तसं चालवत नाही. यानंतर पोलिस काहीतरी बोलताच तो पुढे म्हणतो की, आम्ही गाड्या पळवल्या तर तुम्ही आहेच ना फोटो काढायला. हे ऐकताच पोलिस टाळी देत हसतो आणि पुढे अशाच गप्पा करत दोघांना तो हॅप्पी जर्नी म्हणत सोडतो. पोलिसाचे हे रुप पाहून एक बाईकस्वारदेखील खूप खूश होतो आणि पुढे जात म्हणतो की, असे प्रेमळ पोलिसवालेपण आहेत यार, त्यांना गाडी बघायची म्हणून थांबवलं. बाईकस्वार आणि ट्रॅफिक पोलिसाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कारण यात ट्रॅफिक पोलिसामधील एक प्रेमळ माणूस दिसून आला. हा सुंदर व्हिडीओ karnu_4545 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, आई गं, किती भारी पोलिसवाला आहे हा.. दुसऱ्या एकाने लिहिले की, असा पोलिसवाला सगळ्या बाईक रायडर्सना भेटावा अशी इच्छा आहे. आणखी एकाने लिहिले की, जेव्हा स्वप्न जबाबदारीमुळे संपतात तेव्हा चेहऱ्यावर असे हास्य येते. अनेकांनी तर ट्रॅफिक पोलिसवाला पाहिजे तर असा, म्हणत कौतुक केले आहे. पण, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा.

Story img Loader