नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानंतर ती टो होणारच. मग एकतर दंड भरून गाडी घेऊन यायची किंवा तिथेच विनवण्या वगैरे करून गाडी सोडवून घ्यायची असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना हा अनुभव काही नवा नाही पण कानपूरमध्ये याहूनही एक अजब घटना लोकांना पाहायला मिळाली.

एका चालकाची बाईक टो करुन नेत होते, या चालकाने मात्र याला विरोध केला, तो काही आपली गाडी द्यायला तयार नव्हता शेवटी कर्मचा-यांनी त्याच्यासकट बाईक क्रेनला अडकवली आणि घेऊन गेले. कानुपरमधल्या बडा चौराह भागात हा विनोदी प्रकार घडला. गाडी टो करायला आलेल्या वाहतूक पोलीस अधिका-याला त्याने विरोध केला. शेवटी हा असा काही ऐकणार नाही असे मनात आणून चालकासकटच पोलिसांनी बाईक क्रेनला अडकवली, तेव्हा क्रेनला लटकत असेली बाईक आणि त्यावर हा धाडसी चालक असे काहीसे गंमतीदार चित्र रस्त्यावर पाहायला मिळालं. आता रस्त्यावरच्या लोकांनी याचा व्हिडिओ काढला नाही तर नवल. तेव्हा अनेकांना विनोदी प्रकारचा व्हिडिओ काढण्याचा मोह अनावर होत होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : यासाठी राणीच्या हातात नेहमी पर्स असतेच

Story img Loader