Heart Attack During Marriage: हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हृदयविकाराशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कुठे तो जेवण करत होता, कुठे नाचत होता तर कुठे जिममध्ये त्याला अचानक हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले, अशा घटना समोर आल्या आहेत. पण साता जन्माच्या शपथा घेण्याआधीच जोडीदाराने साथ सोडून जगाचा निरोप घ्यावा याहून दुर्दैव काय असेल.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे लग्नाच्या एक दिवस आधी एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. एका कार्यक्रमादरम्यान नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाला. यावेळी काही मिनटांत आनंदाचं रुपांतर दु:खात झालं असल्याचे दिसत आहे.ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरदेवाला भर समारंभात अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तो जमिनीवर कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

शिवम (२२) असे वराचे नाव असून तो कोतवाली हाथरस गेट परिसरातील भोजपूर गावचा रहिवासी होता. आग्रा येथील रहिवासी असलेल्या मोहिनीसोबत सोमवारीत्यांचे लग्न ठरले होते. प्री-वेडिंग फंक्शन्स रविवारी संध्याकाळी सुरू झाले आणि पाहुणे देखील आले. या कार्यक्रमात नवरदेव उत्साहाने नाचत होता त्यानंतर तो खुर्चीवर बसायला गेला तिथे तो अचानक कोसळला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, तेथे रुग्णालय प्रशासनाने त्याला मृत घोषित केले. मात्र, कुटुंबीयांचा विश्वास बसत नसल्याने त्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीही तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी पुष्टी केली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये लग्नाआधीच्या सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांसोबत नवरदेव डान्स करताना दिसत आहे. तरुण खुर्चीवर बसतो आणि अचानक जमिनीवर कोसळतो.लग्नाच्या अवघ्या एक दिवस अगोदर नवरदेवाचे निधन झाल्याने लग्नातील आनंदी वातावरण शोककळा पसरले. तरुणाच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली होती. शिवमच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने नवरीलाही मोठा धक्का बसला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “बिझनेस करायचाय पण…” रिक्षाचालकानं रिक्षामध्ये लावलं भन्नाट पोस्टर; वाचून म्हणाल इच्छाशक्ती असली की सगळं शक्य

संपूर्ण देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुण आणि लहान मुलांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना, खेळताना, धावत असताना, नाचताना आणि अगदी निष्क्रिय बसल्यानेही अनेक मुलांना हृदयविकाराचा झटका येतो.

तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. व्हिडिओंमध्ये तरुणांना त्यांच्या कार्यालयात काम करताना, जिममध्ये व्यायाम करताना आणि खेळ खेळताना हृदयविकाराचा झटका येत असल्याचे दिसते.हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना सीपीआर देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेषत: बस स्टॉप, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांना प्रशिक्षण दिले पाहिजे. यामुळे या ठिकाणी अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मदत होऊ शकते.

Story img Loader