Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. असाच धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये श्वानाचा पाठलाग करणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. तिसऱ्या मजल्यावरून तरुण कसा मृत्यूच्या दाढेत गेला हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो हे तुम्हाला हा व्हिडीओ बघून कळेल. तर झालं असं की, हैद्राबादमध्ये मित्रांच्या पार्टीला दुःखद वळण मिळाले आहे. वाढदिवसाच्या पार्टीला आलेले तरुण हैद्राबादमधील एक हॉटेलमध्ये थांबले असताना एक तरुण चुकून हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पडतो आणि मरण पावतो. तरुणाच्या मृत्यूचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. उदय कुमार (२२) हा शहरातील व्हीव्ही प्राइड हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी तो हॉटेलच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री, उदय त्याच्या खोलीच्या बाहेर पडला आणि लॉबीकडे चालत गेला, तिथे त्याला एक श्वान दिसला. समोर श्वान दिसल्यावर उदयने सुरुवातीला त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. नंतर असे दिसले की, तो खेळकरपणे श्वानाच्या पाठून धावत होता. यादरम्यान दुर्दैवाने उघड्या खिडकीतून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. तरुण खाली पडल्यावर मोठा आवाज झाला. त्यावेळी हॉटेलमधील अन्य व्यक्तींनीदेखील तेथे धाव घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उंचावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हा श्वान हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर कसा पोहोचला आणि तेथे खुलेआम कसा फिरत होता हे स्पष्ट झालेले नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बाई हा काय प्रकार? अविवाहित प्रवाशांसाठी मेट्रोमध्ये अचानक झाली ‘ही’ अनाऊंसमेंट; ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sudhakarudumula नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले, यामध्ये त्या तरुणाचीच चूक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tragic hyderabad youth falls off 3rd floor of hotel building while trying to shoo away dog dies video surfaces shocking video srk