Heart Attack Video : सध्या भारतासह जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणा वाढतेय. पूर्वी केवळ वृद्धांपर्यंत सीमित असलेला हा आजार हल्ली शाळकरी मुलांपासून ते तरुणांमध्येही झपाट्याने वाढतोय; ज्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागतोय. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. एक दुकानदार त्याच्या दुकानात बसून मित्रांसह हसत खेळत गप्पा मारत होता. मात्र, त्याचदरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हसतं खेळतं वातावरण अचानक दु:खात बदललं. दुकानदाराच्या मृत्यूचा लाइव्ह थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात गाठले मृत्यूने

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. त्याशिवाय एका लहान शाळकरी मुलीलाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावावा लागला. या घटनेनंतर आता अशाच प्रकारे एका दुकानदारालाही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात मृत्यूने गाठले.

actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
saif ali khan autodriver got money
जखमी सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाला देण्यात आलं बक्षीस, मिळाली ‘इतकी’ रक्कम
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू
Mushtaq Ahmed digging grave of Yasmeen Akhtar, last daughter of Mohammad Aslam dying of mystery illness
एक लग्न अन् १७ अंत्यसंस्कार, जम्मूतील गावात रहस्यमय आजार; ३ कुटुंबे उद्ध्वस्त, मृत्यूच्या कारणांंमुळे तज्ज्ञही हैराण
Pune quiz
“बाग आहे पण फुले नाहीत? सांगायला दगड पण आहे गाव?..”ओळखा पाहू पुण्यातील परिसराचे नाव! खऱ्या पुणेकरांना माहित असेल उत्तर?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक दुकानदार त्याच्या दुकानात काही मित्रांबरोबर आरामात गप्पा मारत बसला आहे. मित्रांसह तो हसत खेळत गप्पा मारतोय. मात्र, बोलता बोलता तो दुकानाच्या काउंटरवर कोसळला. काही वेळ मित्रांनाही समजले नाही की, तो नक्की असे का करतोय. पण, त्याने जेव्हा मान टाकली तेव्हा सर्वांनी त्याला पकडले. त्यानंतर काहींनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. एका मित्राने हृदयावर दाब देऊन, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो काही उठला नाही. यावेळी मित्रांनी धाव त्याला रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हसते खेळते वातावरण अचानक दु:खात बदलले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या घटनेवर शोक व्यक्त करत भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे वाढते प्रमाण पाहून चिंता व्यक्त केली आहे.

Story img Loader