Bareilly : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे.एका कौंटुबिक सोहळ्यामध्ये पती-पत्नी नाचत होते, सर्व नातेवाईक -मित्र मंडळी या क्षणाचा आनंद घेत होते. दरम्यान नाचता नाचता पती अचानक स्टेजवर कोसळला. नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन सुरु असताना असे काही घडले सर्वत्र शोककळा पसरली.
वसीम आणि फराह यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवशी शहरातील एका आलिशान हॉटेल फहम लॉनमध्ये आयोजन करण्यात आले होते, जिथे एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती. कुटुंबातील सदस्य आणि मित्र बँक्वेट हॉलमध्ये या सोहळ्याचा घेत होते. वसीम आणि फराह देखील स्टेजवर नाचत आपला आनंद व्यक्त करत होते.
काही समजण्याआधीच नाचता नाचता वसीम अचानक स्टेजवर कोसळले. अचानक वसीम खाली पडल्याने सर्वांना धक्का बसला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वसीम हे एक बूट व्यापारी आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वसीम त्याच्या पत्नीसह स्टेजवर नाचताना दिसत आहे, परंतु तो अचानक कोसळतो. व्हिडिओमध्ये त्याची पत्नी त्याच्याकडे धावत असल्याचे दिसून येते आणि काही वेळातच जमिनीवरील लोक त्याला उठवण्यासाठी स्टेजवर येताना दिसतात. वसीमला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. वसीम यांच्या पश्चात त्यांची पत्नी फराह आणि दोन मुले आहेत. फराह ही एक शाळेत शिक्षिका आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एका लग्न समारंभात स्टेजवर नाचत असताना एका २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. असा संशय आहे की, तिला नाचताना हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे तिचा स्टेजवर अचानक मृत्यू झाला होता.