Train Accident Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आला आहे. त्यात ट्रेन रुळांवरून घसरल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांनी दावा केला आहे की, राजस्थानमधील भिवानी स्टेशनवरून सुटलेली ही ट्रेन रुळांवरून घसरली आणि थेट शेतात घुसली. ही ट्रेन जयपूरला जात होती. या ट्रेनच्या अपघातामुळे आठ ट्रेन अंशत: रद्द झाल्या आहेत. ही घटना अलीकडील राजस्थानमधील भिवानीमध्ये घडलेल्या ट्रेन अपघाताची असल्याचे सांगून, लोक ती शेअर करीत आहेत. पण, आम्ही या व्हिडीओचा तपास केल्यावर काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. हे तपशील नेमके काय आहेत ते जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

X युजर FirstBiharJharkhand ने व्हायरल व्हिडीओ याच दाव्यासह शेअर केला.

A young man fell down while getting off the running train viral video of train accident
“मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Stampede at Bandra Station
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!
Indian Railways parcel service video
ट्रेनमधून पार्सल पाठवताय? मग हा Viral Video एकदा पाहा; तुम्हालाही बसेल धक्का
Indian Railways blanket washing | bed linen cleanliness
Indian Railway : ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करताय का? मग तुम्हाला मिळणारी चादर, ब्लँकेट महिन्यातून किती वेळा धुतले जात माहितेय का?
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
Snake in Train Viral Video
Snake in Train : बापरे! धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा जिवंत साप अन् प्रवाशांचा उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओच्या कॅप्शनवर Google कीवर्ड सर्चद्वारे आमचा तपास सुरू केला.

कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला कळले की, भिवानी स्टेशनवर ट्रेन रुळांवरून घसरली.

https://www.bhaskar.com/local/rajasthan/jaipur/news/goods-train-derailed-at-bhiwani-station-133449405.html
https://www.patrika.com/jaipur-news/goods-train-derailed-at-bhiwani-station-7-trains-partially-cancelled-18900301

त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून मिळविलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. यावेळी आम्हाला २०२२ मध्ये एक्सवर पोस्ट केलेली एक पोस्ट मिळाली.

हेही वाचा- bangladesh crisis : शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर दाखल? Video नेमका कधीचा? अखेर सत्य आलं समोर

हा व्हिडीओ ४ सप्टेंबर २०२२ रोजी पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये ही घटना महाराष्ट्रातील सोलापूरजवळ घडल्याचे सुचविण्यात आले आहे.

आम्हाला TV Khabristan नावाच्या यूट्यूब चॅनेलवरदेखील हा व्हिडीओ सापडला.

त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, सोलापूर के पास मैदान में WAG9 || WAG9 into the field Near Solapur

आम्हाला याबद्दल काही बातम्यादेखील आढळल्या.

Read More Fact Check News : Bangladesh Violence :तोंडावर टेप अन् हात-पाय दोरीने बांधून फेकले रस्त्यावर! बांगलादेशात हिंदू मुलीचे अपहरण? पाहा खरं काय

https://www.patrika.com/mumbai-news/maharashtra-train-accident-goods-train-derailed-in-solapur-engine-entered-in-field-no-casualties-7750167

निष्कर्ष :

सोलापूरजवळ रेल्वे रुळांवरून घसरल्याचा जुना व्हिडीओ राजस्थानमधील भिवानी येथील नुकत्याच घडलेल्या ट्रेन अपघाच्या घटनेचा सांगून शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हायरल होणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.