Train Accident Fact Check : काही महिन्यांपासून ट्रेनचे अपघात होण्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. त्यात लाईटहाऊस जर्नालिझमला रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओच्या माध्यमातून दावा करीत म्हटले गेलेय की, बिकानेरजवळ दोन रेल्वेगाड्या समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात रुळांवर ट्रेनचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढल्याचे व्हिडीओत दिसतेय. तसेच अनेक प्रवाशांना उपचारांसाठी स्ट्रेचरवरून नेण्यासाठी धावपळ सुरू असल्याचेही व्हिडीओत दिसतेय. पण, आम्ही या व्हिडीओचा तपास केला तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले, ते नेमके काय आहे ते जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स यूजर प्रवीण पंघल यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच ही व्हिडीओसंबंधीची पोस्ट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग केली गेली आहे.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक
indian railways shocking video
रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक
Terrifying accident woman and child bus accident viral video
VIDEO: भयंकर अपघातात महिलेसह चिमुकल्याचा ‘असा’ वाचला जीव; बसमध्ये जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

इतर एक्स युजरदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला यूट्यूबवर SSSO News द्वारे पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला. व्हिडीओच्या वर्णनात नमूद केले आहे की, हे मॉक ड्रिल दाखविण्यात आले आहे.

“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा

आम्हाला patrika.com वर या मॉक ड्रिलबद्दल एक बातमी मिळाली.

https://www.patrika.com/bikaner-news/in-a-train-accident-a-coach-climbed-over-another-coach-many-were-injured-this-matter-came-to-light- नंतर-19148637

रिपोर्टमध्ये नमूद केले होते : आज रेल्वे विभागाने रेल्वे अपघातादरम्यान बचावासंबंधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बिकानेर विभागातील लालगढ स्टेशन यार्ड येथे एक मॉक ड्रिल घेण्यात आले होते. त्यात रेल्वे अपघाताच्या वेळी आरोग्य सेवा, प्रशासकीय अधिकारी, NDRF, SDRF व नागरी विभाग यांची बचाव पथके कशा प्रकारे परिस्थिती हाताळू शकतात याचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी लालगड रेल्वे स्टेशन यार्डमध्ये रेल्वे अपघात दर्शविणारा एक नकली सेट तयार करण्यात आला होता. त्यातून असे दृश्य दाखविण्यात आले की, शंटिंग ऑपरेशन्सदरम्यान दोन ट्रेनची आपापसांत धडक झाली. त्या धडकेत ट्रेनचा एक डबा थेट जाऊन दुसऱ्या डब्यावर चढल्याचे दाखवण्यात आले आहे.

आम्हाला इतर मीडिया वेबसाइटवरदेखील अशाच बातम्या आढळल्या.

https://www.bhaskar.com/local/rajasthan/bikaner/news/railway-mock-drill-in-bikaner-133958195.html

निष्कर्ष :

बिकानेरमध्ये रेल्वे विभागाने लालगड स्टेशन यार्डमध्ये रेल्वे अपघात झाल्यास अधिकाधिक नुकसान टाळण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांकडून कशा रीतीने बचाव करण्यात येईल याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिलचे घेण्यात आले होते. त्याच मॉक ड्रिलचा एक व्हिडीओ रेल्वे अपघाताचा असल्याचा दावा करीत शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader