सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिले असतील. त्यात अनेकदा रेल्वे अपघातांचं प्रमाणदेखील जास्त असतं. मजा-मस्तीसाठी ट्रेनमध्ये स्टंट करीत काही जण आपला जीव धोक्यात टाकतात; तर काही जण आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या रुळांमध्ये जाऊन उभे राहतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकालच्या या स्वार्थी जगात काही माणसं अशी आहेत की, जी स्वत:आधी दुसऱ्यांचा विचार करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका माणसाच्या जीवावर बेतणार इतक्यात एक माणूस स्वत:चा जीव धोक्यात टाकून, त्या माणसाचा जीव वाचवतो.

हेही वाचा… “ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये रेल्वे रुळांवर काहीतरी काम करताना एका माणसाबरोबर अशी धक्कादायक घटना घडते, जी पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, काही कामगार रेल्वे रुळांच्या आसपास आपापली कामं करत असतात. अशातच एक माणूस रेल्वे रुळांमध्ये उभा राहून एका पिशवीत काहीतरी जमा करीत असतो. तेवढ्यात मागून भरवेगात ट्रेन येते. रेल्वे रुळांमध्ये उभ्या असणाऱ्या माणसाचा जीव धोक्यात आहे हे कळताच तेथे बाजूला असणारा कामगार जोरात धावत येतो आणि त्या माणसाला बाजूला करतो. कामगार रुळांमधून धावत जात, त्या माणसाला घेऊन बाजूला सरकतो आणि वेगात धावत आल्यानं दोघेही खाली कोसळतात.

हा व्हायरल व्हिडीओ @heart_touchinghub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला खऱ्या आयुष्यातील हीरो, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल २.१ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. परंतु, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, दुसऱ्याचा जीव वाचवल्याबद्दल त्या भावाला सलाम.” दुसऱ्यानं, “खूप छान कामगिरी केली सर,” अशी कमेंट केली. तिसऱ्यानं कमेंट करीत विचारलं, “इतक्या वेगानं आणि ट्रेनच्या आवाजानं मागून ट्रेन येताना दिसली नाही का?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train accident man saved a life of another man who was standing on a railway track viral video dvr