सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक लोक आपला जीव धोक्यात घालायला मागेपुढे पाहात नाहीत. शिवाय सध्याची तरुणाई रील बनवण्यासाठी काहीही करायला तयार असते. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं रील बनविण्याच्या नादात अनेकदा ते धोकादायक आणि जिवघेणे स्टंट करत असतात. त्यासाठी ते कधी बाईकवर उभे राहतात तर कधी अनेकवेळा रेल्वे रुळावर रील करतात. मात्र, असे स्टंट करण्याच्या नादात अनेकांना जिवदेखील गमवावा लागतो.

लोकांनी असे जिवघेणे स्टंट करु नयेत यासाठी रेल्वेने अनेकवेळा जनजागृती मोहीमही राबवते, पण तरीही लोकं रेल्वे रुळावर रील करणं थांबवत नाहीत. ज्यामुळे त्यांना मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं. सध्या असाच व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

Shocking video of drunk man drives car on railway track viral video on social media
बापरे! दारूच्या नशेत गाडी घेऊन थेट रेल्वे रुळावर पोहोचला, VIDEO मध्ये पाहा पुढे नेमकं काय घडलं…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Train accident young woman train accident while crossing the railway track brutal accident video viral on social media
बापरे! तिच्या एका निर्णयामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं; रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेन आली अन्…, तरुणीचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
indian railways viral video argument between tte and passenger
टीटीईने व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाला सांगितला भलताच कायदा; “सात वर्षांचा तुरुंगवास अन्….”, पाहा संतापजनक VIDEO
Emotional video of father running behind train to earn money hardwork video viral
एका बापाची मजबुरी! प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, ट्रेनच्या मागे धावत सुटला अन्…; ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
railway nir
“५ रुपयांसाठी एवढी मारहाण?”, एका चुकीमुळे पॅन्ट्री बॉयला मॅनेजरने धू धू धुतला, रेल्वेतील धक्कादायक Video Viral

हेही वाचा- HDFCचे माजी अध्यक्ष दीपक पारेख यांचे १९७८ मधील ‘ते’ ऑफर लेटर Viral; पहिला पगार पाहून थक्कच व्हाल

रील बनवण्याच्या नादात तरुण रेल्वेला धडकला –

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, काही मुलं रील बनवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तीन मुलं रेल्वे ट्रॅकवर उभे राहून आरडाओरडा करत आहेत. या तिघांपैकी एकाच्या हातात काचेची बाटली असल्याचंही दिसत आहे. त्याचवेळी यांच्यातील एक मुलगा ट्रॅकवर रेल्वेची वाट पाहताना दिसत आहे. दरम्यान, रेल्वे रुळावर ट्रेन येते, तेव्हा दोन मुलं रुळावरून खाली उतरतात आणि मोठमोठ्याने ओरडतात. तर तिसरा तरुण रेल्वे अगदी जवळ आल्यानंतर रुळावरून खाली उतरतो, शिवाय त्याला रील बनविण्याची एवढी हौस असते की तो भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेनच्या अगदी जवळून व्हिडिओ शूट करायला जातो. याचवेळी तो जास्त मागे गेल्याने त्याच्या डोक्याला रेल्वे धडकते तो खाली कोसळतो.

पाहा व्हिडीओ –

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, ज्या ठिकाणी ही मुलं रील बनवत होती, तिथे इतरही अनेक मुले उपस्थित असल्याचं दिसत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये रील बनवताना रेल्वेच्या धडकेने लोकांचा मृत्यू होतो. तर कधी धावत्या रेल्वेला लटकण्याचा स्टंट करण्याच्या नादात विजेच्या खांबाला धडकल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकांनी असे जीवघेणे स्टंट करु नये असं रेल्वे प्रशासन सतत आवाहन करत असते.

Story img Loader