Mumbai Local Accident: लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक वेगवेगळ्या शहरांत जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’, असं म्हणत लोकलमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या असंख्य माणसांची दर दिवशी गर्दी पाहायला मिळते.
अनेकदा ट्रेन सुटेल म्हणून लोक चालती ट्रेन पकडायला जातात आणि अपघात आपल्याच अंगाशी ओढून घेतात. सध्या असाच प्रकार एका मुलीबरोबर घडलाय. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भोपाळ येथील अशोकनगर रेल्वे स्थानकावर एका १४ वर्षीय मुलीचा चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना चुकून पाय घसरून अपघात झाला. हा संपूर्ण अपघात प्लॅटफॉर्मवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्रेन पकडायला गेली अन्…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मुलगी ट्रेन पकडण्यासाठी धावताना दिसते पण तिचा तोल जातो आणि ती ट्रेनखाली पडते. तेवढ्यात जवळचेच एक पोलिस तातडीने तिची मदत करतात आणि तिला खेचून प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठिकाणी आणतात.
मुलीचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ या @nitendrasharma2 एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अशोकनगर रेल्वे स्थानकावर जीआरपी कॉन्स्टेबल गोविंद सिंह चौहान यांनी १४ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले, अपघात टळला.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
या गंभीर घटनेत सुदैवाने, मुलीला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर लोक कॉन्स्टेबलच्या धाडसाचे कौतुक करत आहेत आणि त्याला खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणत आहेत.
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, एका युजरने कमेंट करत लिहिलं, “चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणे अत्यंत धोकादायक असू शकते” तर दुसऱ्याने “तुमच्या आईबापाचा तरी विचार करा…” अशी कमेंट केली.
या घटनेला प्रतिसाद म्हणून, रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरक्षा सूचना देखील जारी केल्या आहेत, ज्यामध्ये रेल्वे नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी प्रवाशांना स्टेशनवर सावधगिरी बाळगण्याचे आणि ट्रेन सुरू झाल्यानंतर पकडण्याचा प्रयत्न टाळण्याचे आवाहन केले आहे, कारण अशा कृतींमुळे गंभीर अपघात होऊ शकतात किंवा जीवितहानी देखील होऊ शकते.