‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं वा ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित मार्गाने प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे रूळ ओलांडू नका, असं अनेकदा सांगूनही वेळ वाचवण्यासाठी वा उशीर झालाय या कारणास्तव लोक सर्रास रेल्वे रूळ ओलांडण्याचे जीवावर बेतू शकणारे कृत्य करतात. अनेकदा सुखरूप रेल्वे रूळ ओलांडून जातोही; पण कित्येकदा अशा प्रसंगी गंभीर आणि भयंकर अपघातही होतात. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाला मुकावं लागतं. पण, असं सगळं असूनही जो तो आपली मनमानी करीत असतो आणि त्यामुळे नियम तर मोडले जातातच; पण यात अनेकदा जीवही जातो हे अनेकांना कळत नाही. सध्या अशीच काहीशी घटना एका ठिकाणी घडलीय की, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक तरुणी रेल्वे रूळ ओलांडत असते आणि तितक्यात समोरून एक मालगाडी येते. पुढे काय होतं, ते जाणून घ्या…

तरुणीचा भयंकर अपघात

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक तरुणी आपली सायकल घेऊन रेल्वे रूळ ओलांडताना दिसतेय. रेल्वे रूळ ओलांडत असताना ती अचानक मधेच थांबते. तोपर्यंत मालगाडी येते आणि तिला धडक देऊन निघून जाते. स्वाभाविकत: ती तरुणी मालगाडीखाली चिरडली जाते.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @updateindiatv अकांउटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला ‘मुलगी रेल्वे रूळ ओलांडत होती तेवढ्यात ट्रेन आली अन्…’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, त्या तरुणीनं आत्महत्या केलीय, असंच वाटतंय. दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “तिला क्रॉस करायचं होतं, असं मला वाटतं. कारण ती तिची सायकल घेऊन आली होती, जर तिला आत्महत्याच करायची असती, तर एकटीच आली असती.” तर तिसऱ्यानं “यांचं लक्ष कुठे असतं देव जाणे”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “लोक खूप बेफिकीर झाले आहेत.”