ट्रेनच्या अपघातात एखाद्यानं वाचणं म्हणजे दैवी कृपाच. अनेकदा वाचल्यानंतर कायमचं अपंगत्व घेऊन जगावं लागतं. त्यामुळे ट्रेनचा अपघात म्हटलं की अंगावर काटा येतो. ट्रेन अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात कुणी सुदैवाने वाचतं, तर कुणाला प्राणाला मुकावं लागतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही काळजाचा ठोका चुकेल. व्हिडीओत एक जेसीबी ड्रायव्हर ट्रेनच्या रुळावरून रस्त्याच्या त्या बाजूला जात आहे. मात्र ट्रेन जवळ असल्याचा जेसीबी ड्रायव्हरला अंदाज नव्हता. जेसीबी रुळावर पोहोचते तोच वेगाने येणारी ट्रेन जोरदार धडक देते.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, ट्रेनने किती जोरात धडक दिली आहे. धडकेनंतर जेसीबी जागच्या जागेवर गोल फिरते. सुदैवाने जेसीबी रुळाच्या बाजूला फेकली गेल्याने ड्रायव्हरला कोणतीही इजा होत नाही. इतका भीषण अपघातानंतरही ड्रायव्हर जेसीबी घेऊन माघारी येतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ट्रेन आणि जेसीबी अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६.५ मिलियन व्यूज मिळाले आहेत. यासह दीड लाखांहून अधिक जणांनी लाइक केला आहे. तसेच नेटकरी आपल्या अंदाजात व्हिडीओखाली कमेंट्स करत आहेत.