Russian Train Bombing Video: रशियातील बुरियाटिया येथील बैकल अमूर मेनलाइनवरील सेवेरोमुयस्की बोगद्यातून प्रवास करताना २९ नोव्हेंबर रोजी इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीने पेट घेतला होता असे सांगणारे वृत्त आहे. काही तासांनंतर दुसरा स्फोट जवळच्या डेव्हिल्स ब्रिजवरून प्रवास करत असणाऱ्या दुसर्‍या इंधनवाहू ट्रेनजवळ झाला. युक्रेनियन मीडियाच्या माहितीनुसार, दुहेरी ट्रेन बॉम्बस्फोट हा युक्रेनच्या सुरक्षा सेवेने केलेला हल्ला होता, ज्याचा उद्देश रशिया आणि चीन यांच्यातील व्यापारासाठी मुख्य मार्ग म्हणून काम करणारी रेल्वेमार्ग विस्कळीत करणे असा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशियातील रेल्वे बॉम्बस्फोटांमधील मोठ्या आगीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये काही अंतरावर लोक आगीच्या ज्वाळांजवळ उभे दिसत आहेत. एका व्यक्तीने फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “बोगद्याच्या तोडफोडीनंतर रशियाचा चीनशी असलेला मुख्य दुवा ‘नष्ट’ झाला आहे, बाशकोर्तोस्तानमधील सेवेरोमुयस्की रेल्वे बोगद्यामध्ये इंधन भरणारी ट्रेन जात असताना स्फोट झाला, ज्यामुळे बोगदा ठप्प झाला. १० हुन अधिक मालवाहू गाड्यांच्या सेवा यामुळे निलंबित झाल्या.

काय होत आहे व्हायरल?

दरम्यान, इंडिया टुडेने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये असे आढळले की, हा मार्च २०२३ मध्ये रशियाच्या स्वेर्दलोव्हस्क ओब्लास्टमध्ये गॅस पाइपलाइन स्फोटाचा जुना व्हिडिओ आहे.

इंडिया टुडेने याबाबत केलेल्या तपासात व्हायरल व्हिडिओमधील कीफ्रेम्सचा शोध घेऊन संबंधित अहवाल तपासण्यात आला. अहवालानुसार, रशियातील स्वेर्दलोव्हस्क ओब्लास्टमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट झाला. अहवालानुसार, पेलिम जिल्ह्यात दुरुस्तीदरम्यान याम्बर्ग-येलेट्स 1 गॅस पाइपलाइनच्या काही भागाला आग लागली होती. मात्र, जीवितहानी किंवा पुरवठा खंडित झाल्याची नोंद नाही. वेगळ्या बाजूने शूट केलेला या घटनेचा आणखी एक व्हिडिओ डेली ग्लोबलने ३० मार्च रोजी शेअर केला होता.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी पेलिम गावाजवळ याम्बर्ग-एलेट्स गॅस पाइपलाइनचे डिप्रेशरायझेशन झाले होते, त्यानंतर गॅस पाइपलाइन विभाग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला, त्यादरम्यान पाईपलाईनला आग लागली.

स्थानिक प्रशासनाचे प्रमुख शाहिद अलीयेव यांनी रशियन माध्यमांना पुष्टी दिली की घटनास्थळी लोक नव्हते आणि त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रिपोर्ट्समध्ये स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ आहे जो एका साक्षीदाराने शूट केला होता.

निष्कर्ष: हे स्पष्ट आहे की हा व्हिडिओ गॅस पाइपलाइनमध्ये जुना स्फोट दाखवणारा आहे आणि रशियामध्ये अलीकडील दुहेरी ट्रेन बॉम्बस्फोटाशी कोणताही संबंध नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train double bombing video people standing near flames viral clip is of gas pipeline burst watch reality from russia ukraine svs