कोणतेही वाहन चालताना मोबाईल वापरु नये, असं वाहतूक प्रशासनाकडून सतत सांगितलं जाते. कारण वाहन चालताना मोबाईल वापरल्याने अपघात होण्याची दाड शक्यता असते. शिवाय असे अनेक अपघात झाल्याच्या घटनाही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण बाईक कार किंवा ट्रकचे अपघात झाल्याचं पाहत असतो. परंतु मोबाईलचा वापर केल्यामुळे रेल्वेचा अपघात झाल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का? नाही, तर मग सध्या सोशल मीडियावर अशा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोबाईलचा वापर केल्यामुळे रेल्वेचा अपघात झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे अपघाताच्या वेळी महिला ड्रायव्हर मोबाईल वापरताना दिसत आहे. या अपघाताचा सर्व थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला ड्रायव्हरने रेल्वे चालवताना मोबाईल वापरल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ CCTV Idiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
हेही पाहा- धावत्या बसचा एक्सलेटर तुटला; ड्रायव्हरने दोरीचा आधार घेतला अन्…, थरारक घटनेचा Video व्हायरल
हा व्हिडीओ जुना असला तरी तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रेल्वे चालक केबिनमध्ये बसल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी तिच्या हातात मोबाईल फोन असल्याचं दिसत आहे. ती तिच्या मोबाईलमध्ये इतकी व्यस्त असते की, त्याच ट्रॅकवरुन समोरुन येणारी रेल्वेही तिला दिसत नाही. शिवाय ज्यावेळी तिचं लक्ष समोरुन येणाऱ्या रेल्वेकडे जातं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. व्हिडीओत या महिलेला समोरुन आलेली रेल्वे दिसताच ती पूर्णपणे गोंधळते आणि रेल्वे थांबवण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे एकाच ट्रॅकवर समोरासमोर आलेल्या दोन्ही रेल्वे एकमेकीला जोराची धडक देतात.
हेही पाहा- तरुणाने बाईकमध्ये पेट्रोलऐवजी दारु भरली अन्…, व्हायरल Video पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल
सुदैवाने या रेल्वे अपघातामधून महिला सुखरुप बचावते. शिवाय संपुर्ण व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल की, या अपघातामुळे कोणालाही जास्त दुखापत झालेली नाही. CCTV Ediots नावाच्या अकाऊंटवरुन या रेल्वे अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेल्वे चालवणाऱ्या महिलेच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ खूप जुना असला तरीही सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अनेकांनी महिलेच्या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असता, अशा कमेंट केल्या आहेत.