Train Fight: ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी ट्रेनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. अशातच ट्रेनमध्ये होणारी भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत. त्यात महिलांची भांडणं काही साधीसुधी नसतात. भांडता भांडता कधी त्या हाणामारीपर्यंत येऊन पोहोचतील हे सांगता येत नाही.
सोशल मीडियावर अनेकदा अशा भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता २०२५ या वर्षाची सुरुवात झाली आणि ट्रेनमध्ये कोणतीच भांडणं नाही झाली असं कसं होईल. यावर्षीदेखील ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण झालं आणि हे भांडण मारामारीपर्यंत पोहोचलं. शेवटी टीसीला यात हस्तक्षेप करावा लागला, तेव्हा कुठे जाऊन सगळं शांत झालं, नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
दोघी ट्रेनमध्येच भिडल्या
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका ट्रेनमध्ये दोन महिला मारामारी करताना दिसत आहेत. एकमेकींचे केस ओढत दोघी जोरजोरात भांडताना दिसतायत. महिलांची मारामारी पाहायला गर्दी जमलीय, पण कोणीही त्यांची भांडणं सोडवण्यासाठी पुढे आल्याचं दिसत नाही. अखेर टीसी या भांडणाच्या मध्ये पडतो आणि दोन्ही महिलांना वेगळं करतो.
महिलांच्या मारामारीचा हा व्हिडीओ @sanjaykumar373136kalu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे आणि कोणत्या ट्रेनमध्ये घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.
हेही वाचा… काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
युजर्सच्या प्रतिक्रिया
ट्रेनमधील महिलांचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या देशात लोक इतरांच्या भांडणात आपली मजा आणि टाइमपास करतात”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “टीसी सरांना सलाम आहे.” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “लहान मुलं किती घाबरली आहेत बघा.” तर एकाने “जग किती वाईट आहे, भांडण सोडवण्यापेक्षा व्हिडीओ रेकॉर्ड करतायत माणसं”, अशी कमेंट केली.