Indian Railways Books Cab For Student : कोणतीच आशा नसताना अचानक मदत मिळाली की मग यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही. असाच काहीसा प्रकार गुजरातच्या या विद्यार्थ्यासोबत घडला. एकता नगर ते वडोदरा ही त्याची ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वेने हे प्रकरण गांभीर्याने घेत चक्क या विद्यार्थ्यासाठी कॅब बुक केलीय. भारतीय रेल्वेने केलेली ही मदत पाहून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. सारेच जण भारतीय रेल्वेने केलेल्या या मदतीचं कौतुक करताना दिसत आहे.
ही घटना गुजरातमधील एकता नगर रेल्वे स्थानकाची आहे. मुसळधार पावसामुळे एक ट्रेन रद्द झाली. अशा परिस्थितीत रेल्वेने आपल्या एका प्रवाशाला मदत करण्याची जबाबदारी घेतली आणि त्याच्यासाठी गाडीची व्यवस्था करून त्याला एकता नगरहून वडोदरा येथे नेले. भारतीय रेल्वेच्या या पुढाकारानंतर आता लोक रेल्वेचे कौतुक करताना थकत नाहीत. आयआयटी मद्रासमध्ये शिकणाऱ्या एरोस्पेस इंजिनीअरिंगचा विद्यार्थी सत्यम गढवी हा ट्रेन रद्द झाल्यामुळे एकता नगर रेल्वे स्थानकावर अडकला. त्याला एकता नगर रेल्वे स्थानकावरून वडोदरा येथे जाणारी ट्रेन पकडायची होती, जी मुसळधार पावसामुळे रद्द झाली. अशा स्थितीत भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने सोय करण्याचे ठरवले आणि त्याच्यासाठी कॅब बुक केली, जेणेकरून तो चेन्नईला जाऊ शकेल.
आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल
सत्यम गढवी या तरूणाने स्वतः एक व्हिडीओ शूट करत तो त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने भारतीय रेल्वेचे आभार मानले आहे. “माझा प्रवास यशस्वी केल्याबद्दल मी भारतीय रेल्वेचा खूप खूप आभारी आहे. जी ट्रेन मी बुक केली होती, त्यामधून एकता नगरवरून ९:१५ वाजता निघणं अपेक्षित होतं. पण मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळांवर साचलेल्या पाण्यामुळे माझी ट्रेन रद्द झाली. पण एकता नगर स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी माझ्यासाठी कॅब बुक केली. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की ते रेल्वेच्या प्रवाशांना किती महत्त्व देतात. ड्रायव्हर खूप चांगला होता.”
आणखी वाचा : अशा पद्धतीने डाळ तुम्ही कधी खाल्ली आहे का? हा VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : मॅनहोलमध्ये पिल्लाला पडलेलं पाहून हत्तीण बेशुद्ध! बचाव मोहिमेचा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. त्याचा हा व्हिडीओ डीआरएम वडोदराच्या अकाउंटवरून सुद्धा शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण भारतीय रेल्वेने घेतलेल्या या पुढाकाराचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ‘गुड जॉब….सलाम…’, ‘त्या रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना सलाम ज्यांनी या मुलाची मदत केली’ अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स करत लोक कौतुकाचा वर्षाव करत आहेत.