Viral video: रस्त्यावर प्रचंड रहदारी असते त्यामुळे ट्राफिकची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. आज-काल कुठेच ट्राफिकची समस्या नवी नाही. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला ट्राफिकला समोरं जावं लागतं. बेंगळुरूची ट्रॅफिक जगभर प्रसिद्ध आहे, जर तुम्ही एकदा या ट्रॅफिकमध्ये अडकलात तर त्यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे. अलीकडेच बेंगळुरूने सर्वाधिक रहदारी असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र याआधी तुम्ही कधी ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं ऐकलं आहे का ? नाही ना. मग हा बंगरुळमधला व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नक्की डोक्याला हात माराल..
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रेल्वे फाटकाचा आहे जिथे वाहतूक कोंडी दिसत आहे. सहसा, जेव्हा एखादी ट्रेन येते तेव्हा फाटक बंद केले जाते जेणेकरून वाहतूक थांबते आणि ट्रेन तिथून पुढे जाते. पण ट्रेननेही बेंगळुरूच्या ट्रॅफिकपुढे शरणागती पत्करली. होय, रेल्वे फाटकावर प्रचंड रहदारीमुळे ट्रेनही ट्रॅफिकमध्ये अडकली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गेटजवळील ट्रॅकवर ट्रेन ट्रॅफिकची वाट पाहत आहे आणि लोक आरामात तेथून जात असल्याचे दिसत आहे.
दरम्यान आता याप्रकरणी रेल्वेचे वक्तव्य समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दक्षिण पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकली नव्हती, परंतु तांत्रिक समस्येमुळे मुन्नेकोल्लाला गेटजवळ थांबवण्यात आली होती. त्याचं झालं असं की, लोको पायलटला ट्रेनमधून काहीतरी आवाज आला तेव्हा त्याला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले, त्यानंतर त्याने तांत्रिक मदत येईपर्यंत ट्रेन तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी फाटक उघडून वाहतूक रिकामी करण्यात आली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “जेव्हा सासूला आवडती सून भेटते” सुनेच्या स्वागतासाठी सासूबाईंनी केला भन्नाट डान्स; वऱ्हाडीही राहिले बघत
शिल्पा नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर अनेकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर युजर्स व्हिडिओबाबत विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले… आता रेल्वेला रस्त्यावरील वाहतूकही हाताळावी लागणार आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… ट्रेन काही अन्य कारणास्तव थांबविण्यात आली आहे, रेल्वेने ते मंजूर केलं आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हे बेंगळुरू आहे, इथे काहीही होऊ शकते.